एक्स्प्लोर
Advertisement
लडाखमध्ये चीनचा घुसखोरीचा प्रयत्न, भारताचं चोख प्रत्युत्तर
एकीकडे देशभरात स्वातंत्र्य दिनाचं जल्लोष सुरु असताना काल (15 ऑगस्ट) लडाखमध्ये मात्र चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी चोख उत्तर देऊन त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
लडाख : सिक्कीमजवळील डोकलाम येथील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून गेल्या महिनाभर भारत-चीनमध्ये वाद सुरू असतानाच आता चीनने लडाख सीमेवरही भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे.
लडाखमधील पँगाँग सरोवराच्या किनाऱ्यावरील फिंगर फोर आणि फिंगर फाइव्ह या ठिकाणी चिनी सैन्याने काल (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी ६ ते ९च्या सुमारास दोन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा भारतीय सैन्याने तो हाणून पाडला.
भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील काही सैनिक किरकोळ जखमी झाले.
चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैनिकांनी मानवी साखळी करुन त्यांना तिथल्या तिथेच थोपवलं. भारतीय सैनिकांकडून मिळालेल्या या चोख उत्तरानंतर अखेर चिनी सैनिकांनी माघार घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement