एक्स्प्लोर

रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थांवर कॅगचे ताशेरे

रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या खाण्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत. रेल्वेत प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखली जात नसल्याचं कॅगनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या खाण्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत. रेल्वेत प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखली जात नसल्याचं कॅगनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे बेस किचन रेल्वे स्टेशनपासून लांब असतात. या किचनमध्ये क्वॉलिटी चेक करण्याची कोणतीही सोय नसते. त्यामुळे रेल्वेतील खाणं क्वॉलिटी आणि स्वच्छतेच्या मानकांची पूर्तता करत नाही असं कॅगनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तीन वर्षांमागे रेल्वेनं प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार खाणं दिलं जाईल असं म्हणत जनता मील देण्यास सुरुवात केली होती. मात्र गेल्या तीन वर्षांत सातत्यानं या जनता मीलच्या गुणवत्तेत घसरण झाली असल्याचं कॅगनं म्हटलं आहे, तसंच पुरेशा प्रमाणात हे खाद्यपदार्थ स्टेशनवर उपलब्ध नसल्याचाही ठपका कॅगनं रेल्वेवर ठेवला आहे. रेल्वे स्टेशनवर पुरवल्या जाणाऱ्या जनता मीलबद्दल कोणतीही माहिती प्रवाशांना दिली जात नाही, तसंच त्याच्यावर कोणतीही माहिती लिखित स्वरुपात दिली जात नाही असं कॅगनं म्हटलंय. तसंच बाजारभावापेक्षा जास्त किंमतीत कमी खाणं दिलं जात असल्याचंही कॅगच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या काही तक्रारी असल्यास त्यासाठी तक्रार केंद्रही बनवण्यात आली आहेत, मात्र त्या केंद्रामध्येही तक्रारींचं निराकरण होत नसल्याचं कॅगनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget