एक्स्प्लोर

Purnesh Modi: राहुल गांधींवर मानहानीची तक्रार करणारे भाजप नेते पूर्णेश मोदी यांच्यावर मोठी जबाबदारी, 'या' प्रदेशाच्या प्रभारी पदाची धुरा हाती

Purnesh Modi: भाजपचे नेते पुर्णेश मोदी यांच्यावर दादरा, नगर हवेली आणि दमण या केंद्रशासित प्रदेशाचे राज्य प्रभारी बनवण्यात आले आहे.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने (BJP) दादरा नगर हवेली आणि दमणचे प्रदेश प्रभारी म्हणून पूर्णेश मोदी यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, दुष्यंत पटेल यांची राज्य सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पूर्णेश मोदी  तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पूर्णेश मोदी हे ओबीसी समाजाचे नेते असून पेशाने ते वकिल देखील आहेत. 2013 मध्ये सुरत पश्चिम मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2017 आणि 2022 मध्ये ते याच जागेवरून निवडून आले. गेल्या वेळी ते एक लाख मतांच्या फरकाने विजयी झाले होते. 
2021 मध्ये, त्यांना पहिल्या भूपेंद्र पटेल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आणि त्यांना वाहतूक, नागरी विमान वाहतूक, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास यासारखे खाते देण्यात आले.

राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला

भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्या मानहानीचा आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मार्च महिन्यात निकाल देताना राहुल यांना दोषी ठरवले.  त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती. 13 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात राहुल गांधी यांनी भाषण करताना मोदी आडनावाबाबत भाष्य केले होते. 'सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?' असे राहुल गांधी म्हणाले होते.   यावरुन भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सुरत कोर्टात त्यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिला राहुल गांधींना दिलासा

या प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळाली. 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली. सत्र न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असतानाच गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनीही निर्णयात जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्याची कारणे द्यायला हवी होती.

हेही वाचा : 

Rahul Gandhi : लोक मरत होते आणि पंतप्रधान मोदी थाळी वाजवण्यास सांगत होते; राहुल गांधींची टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget