एक्स्प्लोर
भाजपच्या ‘कर्नाटक बंद’चा बेळगावात फज्जा
महानगर भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुणी यांच्या नेतृत्वाखाली कित्तूर चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांची कर्ज माफी करा मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
![भाजपच्या ‘कर्नाटक बंद’चा बेळगावात फज्जा BJP Karnataka bandh flop show in Belgaum भाजपच्या ‘कर्नाटक बंद’चा बेळगावात फज्जा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/28183153/BJP_Karnataka.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या कर्नाटक बंदचा बेळगावात फज्जा उडाला. शहरातील सगळे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होते. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा मागणीसाठी राज्य भाजप अध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी कर्नाटक बंदचे आवाहन केले होते.
शहरातील आणि आंतरराज्य बससेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होती. सकाळी काही काळ काही मार्गावरच्या बससेवा बंद होत्या. पण काही वेळातच वातावरणाचा अंदाज घेऊन त्या मार्गावरची बससेवा पूर्ववत सुरु करण्यात आली. शहरातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती. नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ झाला त्यामुळे शाळाही विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या होत्या. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या सोमवारी असणाऱ्या परीक्षा मात्र बंदमुळे पुढे ढकलण्यात आल्या.
sकार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून तेथील वाहतूकही काही काळ रोखून धरली. नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन रस्ता वाहतुकीला मोकळा करून दिला. आंदोलनात आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, संजय बेळगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)