बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेची फौज, 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर लढणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या 20 स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे.
मुंबई : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे. बिहारमध्ये 20 नेते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. या नेत्यांमध्ये 12 नेते महाराष्ट्रातील आहेत.
बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक
सुभाष देसाई संजय राऊत चंद्रकांत खैरे अनिल देसाई विनायक राऊत अरविंद सावंत राजकुमार बाफना प्रियांका चतुर्वेदी राहुल शेवाळे कृपाल तुमाणे सुनील चिटणीस योगराज शर्मा कौशलेंद्र शर्मा विनय शुक्ला गुलाबचंद दुबे अखिलेश तिवारी अशोक तिवारी
बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहिर @abpmajhatv pic.twitter.com/BoWaAD6B2S
— Vaibhav Suresh Parab (@vaibhavparab21) October 8, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर लढणार आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यासोबत स्थानिक मुद्दे घेऊन शिवसेना निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचं खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्य बाणाच्या चिन्हावर लढता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.
संबंधित बातम्या
गुप्तेश्वर पांडेंचा बिहार विधानसभेच्या रिंगणातून पत्ता कट, पांडेंची मोठी घोषणा
बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज : अनिल देसाई
Bihar Election 2020 | बिहार निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतरणार