एक्स्प्लोर

बिहार निवडणुकीत गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज : अनिल देसाई

बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार आहे. शिवसेना या निवडणुकीत 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.

मुंबई : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली असून बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असं मत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वक्त केलं. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते

बिहार निवडणुकीत काय रणनीती असेल? "सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. लोकांना कळतंय यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता, तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं. आम्ही आता बिहार निवडणुक लढवून याची परतफेड करणार आहोत. बिहार निवडणुकीत आम्ही 50 जागा लढवत आहोत. 2015 ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती," असं अनिल देसाई यांनी सांगितलं.

गुप्तेश्वर पांडेंविरोधात शिवसेना लढणार? पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन नुकतेच जेडीयूमध्ये प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं. गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. "डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे सर्वांनी पाहिलं होतं. या पदावर राहून असं वक्तव्य करणं हे पांडेंना न शोभणारं होतं. पण आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्यासमोर उमेदवार देत आहोत," अशी माहितीही अनिल देसाई यांनी दिली.

कोणत्या मुद्दयांवर निवडणुकीला सामोरं जाणार? शिवसेना ही महाराष्ट्र वाढलेली पार्टी आहे पण बिहारमध्ये आम्ही स्थानिक मुद्दे घेऊन निवडणूक लढणार आहोत, असं अनिल देसाई यांनी सांगितलं. तसंच "हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही गेली अनेक वर्ष निवडणूक लढत आलो आहेत, यापुढेही आम्ही लढू. आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही," असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात काँग्रेससोबत बिहारमध्ये विरोधात का? महाराष्ट्रात सत्तेत काँग्रेससोबत असलेली शिवसेना बिहारमध्ये मात्र विरोधात लढताना दिसणार आहे. याविषयी अनिल देसाई म्हणाले की, "महाराष्ट्रात जरी काँग्रेससोबत असलो तरी बिहारमधील मुद्दे आणि राजकारण वेगळं आहे. प्रत्येकजण आपल्या अजेड्याने पुढे जात असतो, त्याप्रमाणे शिवसेना पुढे जात आहे."

बिहारचा प्रचार कोण करणार? बिहार निवडणुकीत प्रचाराला शिवसेनेचे स्टार प्रचारक जातील असं अनिल देसाई म्हणाले.

Bihar Assembly Election 2020 | गुप्तेश्वर पांडेंना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज: अनिल देसाई

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget