एक्स्प्लोर
भारतात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध 8 ठिकाणं
म्ही अजून प्लॅन केला नसेल तर असे काही निवडक ठिकाणं आहेत, जिथे जाऊन तुम्ही नव्या वर्षाचं स्वागत करु शकता.
मुंबई : 2017 या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागताची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. अनेक जण अगोदरपासून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. मात्र तुम्ही अजून प्लॅन केला नसेल तर असे काही निवडक ठिकाणं आहेत, जिथे जाऊन तुम्ही नव्या वर्षाचं स्वागत करु शकता.
गोवा : गोव्याला भारताचं लॉस वेगास म्हटलं जातं. गाण्यांवर थिरकणारी तरुणाई, पार्टी आणि समुद्रकिनाऱ्यांवरचा जल्लोष हे गोव्याचं आकर्षण असतं. थर्टी फर्स्टसाठी जगभरातील पर्यटक गोव्यात दाखल होत असतात.
बंगळुरु : ओपन स्पेस, हिरव्यागार गार्डन, मॉल्सचं विश्व आणि पार्टीची विविध ठिकाणं असं बंगळुरुचं वर्णन करता येईल. बंगळुरुमधील रेस्टॉरंट हे पर्यटकांचं आकर्षण असतात. रॉकिंग क्राऊडसोबत लाईव्ह डीजे पार्टीचा आनंद आणखी वाढवतात.
मुंबई : स्वप्ननगरीतही रात्रभर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं जातं. गेट ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह या ठिकाणी मुंबईकर रात्रभर नव्या वर्षाचं स्वागत करण्यात दंग असतात.
दिल्ली : इंडिया गेट हे ठिकाणी दिल्लीत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. महागडे नाईट क्लब, प्रायव्हेट लाँज आणि डीजे पार्टी हे दिल्लीचं आकर्षण आहे.
कोलकाता : कोलकाता हे शहर मोस्ट हॅपनिंग क्राऊडचं शहर म्हणून ओळखलं जातं. कोलकात्यात प्रत्येक वयोगटातील व्यक्ती नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करताना दिसतो. तुम्हीही कधी कोलकात्याला गेला नसाल तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हे ठिकाण निवडू शकता.
केरळ : तुम्हाला पाण्यात आणि निसर्गाच्या सौंदर्यात नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करायचं असेल तर केरळला पर्याय नाही. केरळच्या समुद्रकिनाऱ्यांवरील पार्टीची मजा निराळीच आहे. हाऊस बोट बुक करुन तुम्ही पाण्यात पार्टी करु शकता.
मनाली : मनालीला जाऊनही तुम्ही या वर्षाला निरोप देऊ शकता. मित्र किंवा कुटुंबासोबत येथील हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्टीजमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.
गंगटोक : पूर्वोत्तर भारतात जाऊन तुम्हाला नव्या वर्षाचं स्वागत करायचं असेल तर गंगटोक हे चांगलं ठिकाण आहे. येथील बर्फाची चादर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. लोकल पब आणि बार हे पर्याय तर आहेतच, मात्र स्किंग आणि स्नो बोर्डिंग करुनही तुम्ही सेलिब्रेशन करु शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement