एक्स्प्लोर
LIVE : बाबा गुरमित राम रहीमच्या अनुयायांचा धुडगूस
पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद केली आहे. चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी दिली आहे. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
हरियाणा/पंजाब : डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंह यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पंचकुलातील सीबीआय न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लष्करानं त्यांना ताब्यात घेतलं आहे. पंजाब, हरियाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या दोन्ही राज्यांना छावणीचे स्वरुप आलं आहे.
पंजाब आणि हरयाणातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद केली आहे. चंदीगडमधील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी दिली आहे. पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
LIVE UPDATES :
- बाबा राम रहीम प्रकरण, केंद्र सरकारकडून न्यायाधीशांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश
- पंचकुला इथे झालेल्या मृत्यूंचं खापर पोलिसांवर, पोलीस उपायुक्त अशोक कुमार निलंबित
- डेरा समर्थकांच्या हिंसेबाबत मोदींचं ट्वीट -
- दिल्लीत आतापर्यंत 11 ठिकाणी आगीच्या घटना, फायर ब्रिगेडची माहिती
- दिल्लीतील मंडावली भागात डेरा समर्थकांनी बस पेटवली, दिल्लीत आतापर्यंत तिघेजण अटकेत
- हिंसेत आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू, तर 250 हून अधिक जण जखमी
- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर पंचकुलाच्या दिशेने रवाना
- आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जण जखमी, गृहमंत्रालयाची माहिती
- नोएडातील गौतम बुद्ध नगरमध्ये कलम 144 लागू
- कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी - मनोहरलाल खट्टर, हरियाणाचे मुख्यमंत्री
- हरियाणातील सिरसामध्ये लष्कराचं संचलन
- हिंसेत झालेल्या नुकासन भरपाईसाठी बाबा राम रहीमची संपत्ती जप्त करा, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे आदेश
- पंचकुलात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जण जखमी
#FLASH: 12 dead, at least 100 injured in violent protests in Panchkula #RamRahimVerdict pic.twitter.com/uMbiFTfvpZ
— ANI (@ANI) August 25, 2017
- पंचकुलामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
- हेलिकॉप्टरने रोहतकमधील जेलमध्ये राम रहीम यांना नेण्यात आले
- संगरुरजवळ गेंदगाव येथील वीज कार्यालय पेटवलं
- पंचकुलामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
- पंचकुलामध्ये पोलिसांचा हवेत गोळीबार
- डेरा सच्चा समर्थकांकडून अनेक ठिकाणी जाळपोळ
- अनुयायांची गुंडगिरी, पोलिसांवर दगडफेक
- माध्यमांच्या गाड्यांची जाळपोळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement