एक्स्प्लोर
केजरीवालांविरोधात उपोषण, आमदार कपिल मिश्रांवर हल्ला
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांविरोधात उपोषणास बसलेले आमदार कपिल मिश्रा यांच्यावर हल्ला झाला आहे. यामध्ये त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
हल्लेखोर अंकीत भारद्वाज हा आम आदमी पक्षाचा समर्थक असल्याची माहिती मिळती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हल्ला करणाऱ्या अन्य चार जणांचा शोध सुरु आहे.
‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना जीवे मारण्याची धमकी
कपिल मिश्रा यांनी तीन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेतले असा आरोप त्यांनी केला होता. विरोधकांनीही यावरुन केजरीवालांवर टीका केली होती. केजरीवालांवर आरोप केल्यावर कपिल मिश्रा सध्या दिल्लीच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसले आहेत. आपच्या नेत्यांच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाचा तपशील जाहीर करावा, अशी त्यांची मागणी आहे. मिश्रा हे भाजपची भाषा बोलत असल्याचं सांगत 'आप'ने केजरीवालांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला आहे. 50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे. जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये देताना मी स्वत: पाहिलं, त्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असंही कपिल मिश्रा म्हणाले. दिल्लीच्या जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रिपदावरुन कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिश्रा हे कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात. संबंधित बातम्या:‘केजरीवालांना चॅलेंज, निवडणूक लढवून निर्दोषत्व सिद्ध करा’
केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा
कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र
‘करावे तसे भरावे’, रॉबर्ट वढेरांचा केजरीवालांवर निशाणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement