इथं एकच जात अन् एकच धर्म; अभिनेत्री ऐश्वर्या रायने नरेंद्र मोदींसमोरच सांगितली व्याख्या, पंतप्रधानांनी वाजवल्या टाळ्या
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावर अनेकजण प्रतिक्रिया देत असून अनेकांनी ऐश्वर्याच्या धाडसाचं कौतूक केलंय.

Aishwarya Rai Touch PM Modi Feet : बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन( Aishwarya Rai Bachchan) नुकतीच दिवंगत आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या शताब्दी उत्सवात सहभागी झाली. या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी( PM Narendra Modi) यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याने स्टेजवर जाताच पीएम मोदींच्या पाया पडली आणि त्यानंतर ' इथं फक्त एकच जात अन् एकच धर्म - मानवतेचा' म्हणत पंतप्रधान मोदींसमोरच धर्माची व्याख्या सांगत सर्वांचं मन जिंकलंय. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावर अनेकजण प्रतिक्रिया देत असून अनेकांनी ऐश्वर्याच्या धाडसाचं कौतूक केलंय.
पंतप्रधान मोदींच्या पाया पडली, नंतर म्हणाली ..
दिवंगत अध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या शताब्दी उत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंचावर गेल्यापासून ऐश्वर्याच्या देहबोलीचे, मोजक्याच पण प्रभावी दोन शब्दांचं कौतुक होत आहे . समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, ऐश्वर्या स्टेजवर चढून थेट पंतप्रधान मोदींच्या समोर येतात आणि आदराने त्यांच्या पायांना स्पर्श करतात. पंतप्रधान मोदीही त्वरेने हात जोडून प्रत्युत्तर देतात आणि ऐश्वर्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देतात. हा क्षण पाहून प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करातात . या व्हिडीओची सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे.
यानंतर ऐश्वर्या रायने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत धर्म, जात आणि मानवतेवर प्रभावी आणि हृदयस्पर्शी भाषण दिले. ती आपल्या भाषणात म्हणाली, “ इथं फक्त एकच जात आहे , मानवतेची जात. एकच धर्म आहे, प्रेमाचा धर्म. एकच भाषा आहे, हृदयाची भाषा. आणि एकच ईश्वर आहे, जो सर्वव्यापी आहे. साईराम . जय हिंद " एवढं बोलून ऐश्वर्या थांबली . तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . तिच्या या भाषणावर अनेक जण कमेंट करत आहेत . काहींनी लिहिले आहे, द्वेष हिंसाचार आणि सांप्रदायिकतेच्या विचारसरणीत मानवताच प्रभावी आहे हे ऐश्वर्यानं बेधडकपणे सांगितलंय . तिच्या या विचारांवर पंतप्रधान मोदींनीही टाळ्या वाजवल्या.
#WATCH | Puttaparthi, Andhra Pradesh: Actress and Miss World 1994, Aishwarya Rai Bachchan, says, "There is only one caste, the caste of humanity. There is only one religion, the religion of love. There is only one language, the language of the heart, and there is only one God,… pic.twitter.com/uT7qKV7guN
— ANI (@ANI) November 19, 2025
VIDEO | Puttaparthi, Andhra Pradesh: Actor Aishwarya Rai Bachchan touches feet of PM Modi during the birth centenary celebrations of Sri Sathya Sai Baba.
— Press Trust of India (@PTI_News) November 19, 2025
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/bciaDVyAlu
भाषणादरम्यान त्यांनी पीएम मोदींचे आभार मानले आणि सत्य साईं बाबा यांच्या शिकवणीबद्दल बोलताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात ऐश्वर्याने शांतता, मैत्री आणि सार्वत्रिक प्रेम या मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले.
ऐश्वर्या राय आणि सत्य साईं बाबा यांच्यातील जुना संबंधही सर्वपरिचित आहे. ऐश्वर्याचे पालक सत्य साईं बाबा यांचे निष्ठावान भक्त होते. स्वतः ऐश्वर्याही सत्य साईं बाबा यांच्या शाळेत शिक्षण घेतलं असून त्यांनी बालविकास आणि धर्मशास्त्राशी संबंधित उपक्रमांमध्येही सहभाग घेतला होता. 1994 मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकल्यानंतरही त्या विशेषतः पुट्टपर्थीला जाऊन सत्य साईं बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती. या सर्व पार्श्वभूमीमुळेच शताब्दी सोहळ्यातील तिची उपस्थिती आणि भाषण अधिक अर्थपूर्ण ठरले. कार्यक्रमातील तिचं आदरयुक्त वर्तन आणि सार्वत्रिक प्रेमाचा संदेश यामुळे सोशल मीडियावरही त्यांची भरभरून प्रशंसा केली जात आहे.























