एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/06/2017 1. शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट आरोप, सरसकट कर्जमाफी शक्य नाही, 31 लाख शेतकऱ्यांसाठी योजना बनवत असल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/XmMOVd 2. जगाचा पोशिंदा संपावर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप देशाने पाहिला, बळीराजाच्या संपाने शहरं गॅसवर, भाजीपाला महागण्याची चिन्हं https://goo.gl/VosGF4 3. रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध, भाजीपाला, कांदे, मिरच्यांवर भर रस्त्यात ट्रक फिरवले, नगर,नाशिक, औरंगाबादेत संपाचा जोर https://goo.gl/VosGF4 4. अहमदनगरमध्ये कोपरगावात ट्रक पेटवला, येवल्यात टोलनाक्यावर दगडफेक, मनमाड-नगर रोडवर शंभरभर गाड्या फोडल्या, पुण्यात शेतकरी-पोलिसांची बाचाबाची, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल https://goo.gl/VosGF4 5. नोकरदाराची मुलं उपाशी राहावीत अशी आमची भावना नाही, मात्र आमची मुलं नुसतीच राबताहेत, त्यांचा दाम त्यांना मिळावा, पुणतांब्यातील शेतकरी महिलेची प्रतिक्रिया https://goo.gl/VosGF4 … 6. शेतकरी संप हा सरकार म्हणून भूषणावह नाही, शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून हतबलता व्यक्त https://goo.gl/58y75f 7. शेतकऱ्यांनो संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार, चर्चेविना तोडगा अशक्य, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं आवाहन https://goo.gl/C0OdBm 8. आज मी अस्वस्थ आहे, शेतकरी संपावर शरद पवारांची प्रतिक्रिया, राज्यकर्त्यांनी शहाणपणाचा निर्णय घ्यावा, पवारांचा सल्ला https://goo.gl/E6kgKx 9. शेतकरी संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा, संप मिटेपर्यंत स्वाभिमानीचा दूध संघ बंद, मात्र शेतमालाची नासाडी न करण्याचं राजू शेट्टींचं आवाहन https://goo.gl/VosGF4 10. नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी, रघुनाथदादांचा राजू शेट्टींवर घणाघात https://goo.gl/3Jb2Sa 11. अंध प्रांजल पाटीलचं UPSC मध्ये पुन्हा खणखणीत यश, व्यवस्थेला चपराक, देशात 124 व्या रँकसह घवघवीत यश https://goo.gl/BcZtSp 12. गणेशोत्सवासाठी 142 विशेष गाड्या, मध्य रेल्वेचं कोकणवासियांना गिफ्ट https://goo.gl/AdRlh6 13. 'मोर लैंगिक संबंध ठेवत नाही, त्यामुळे तो राष्ट्रीय पक्षी', राजस्थान हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचं वक्तव्य, गायीला राष्ट्रीय प्राणी करण्याचा सल्ला https://goo.gl/acNZyO 14. सर्व दया याचिका निकाली निघेपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी नाही, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान झुकलं http://abpmajha.abplive.in/ 15. कॉलेज क्रिकेट स्पर्धेपेक्षाही टुकार सुविधा, इंग्लंडमध्ये टीम इंडियासोबत दुजाभाव, विराट कोहली वैतागला https://goo.gl/Ohbkr2 माझा विशेष - शेतकरी संपावर.! विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर सहभाग - भाजप आमदार राम कदम, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, किसान क्रांती मोर्चा समन्वयक संदीप गिड्डे, शेतकरी धनंजय जाधव, शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कालिदास आपेट बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























