एक्स्प्लोर
राम रहीमला 'पद्म' देण्यासाठी 4208 शिफारसी आल्या होत्या!
हरियाणामधून मोठ्या प्रमाणात या शिफारशी करण्यात आल्या. मात्र या शिफारशी पुरस्कार देणाऱ्या समितीकडे पाठवण्याआधीच स्क्रीनिंग कमेटीनेच फेटाळून लावल्या.
नवी दिल्ली : बलात्कारी बाबा राम रहीमला पद्म पुरस्कार मिळवण्याची इच्छा होती. यासाठी त्याने स्वतः नामांकनही दाखल केलं होतं आणि त्याला समाजसेवेसाठी हा पुरस्कार द्यावा, यासाठी हजारो लोकांनी शिफारस केली होती. पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा पद्मश्री यापैकी एक पुरस्कार द्यावा, यासाठी तीन वर्षात 4208 शिफारसी करण्यात आल्या.
4208 शिफारसींपैकी यावर्षी 650 पेक्षा जास्त जणांनी पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली होती. हरियाणामधून मोठ्या प्रमाणात या शिफारशी करण्यात आल्या. मात्र या शिफारशी पुरस्कार देणाऱ्या समितीकडे पाठवण्याआधीच स्क्रीनिंग कमेटीनेच फेटाळून लावल्या.
सर्वाधिक शिफारसी हरियाणातील सिरसा येथून होत्या, जिथे राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाचं मुख्यालय आहे. राम रहीमला पद्म पुरस्काराची एवढी इच्छा होती, की त्याने सेल्फ नॉमिनेशनच्या तरतुदीचा पाच वेळा वापर केला. यामध्ये तीन वेळा त्याचा पत्ता सिरसाचा होता, तर अन्य दोन अर्जांमध्ये एकदा हरियाणातील हिसार आणि दुसऱ्यांदा राजस्थानमधील गंगानगरचा पत्ता दिला होता. गंगानगर हे राम रहीमचं जन्मगाव आहे.
पुरस्कारासाठी गृहमंत्रालयाला शिफारसी पाठवल्या जातात. स्क्रीनिंग कमिटी त्या शिफारसी गृह सचिवांच्या नेतृत्त्वात नियुक्त करण्यात आलेल्या पुरस्कार समितीकडे पाठवण्यापूर्वी अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासते. यामध्येच राम रहीमचं नामांकन रद्द करण्यात आलं होतं.
पद्म पुरस्कारासाठी कुणीही कुणाची शिफारस करु शकतं. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement