राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ; 12 खासदारांचे निलंबन, शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश
RajyaSabha MP suspended राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अधिवेशनातील गोंधळावर ही कारवाई झाली आहे.
![राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ; 12 खासदारांचे निलंबन, शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश 12 Opposition MPs suspended from Rajya Sabha for unruly behaviour during Monsoon Session राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ; 12 खासदारांचे निलंबन, शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2018/08/06144425/Rajysabha-Ele-05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
12 MP from Rajyasabha suspended : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही कारवाई मागील अधिवेशन सत्र काळातील आहे. या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. विरोधकांच्या या आक्रमकतेवर राज्यसभेने कारवाई केली आहे. राज्यसभेने दिलेल्या नोटिसीनुसार, राज्यसभा सदस्यांनी केलेल्या वर्तवणुकीची सभागृहाने गंभीर दखल घेतली आहे. राज्यसभेच्या सभापतींची अवहेलना, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करून गैरवर्तन करणे, हिंसक कृतींद्नारे सभागृहाच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा केलेल्या प्रयत्नांचा निषेध करण्यात येत आहे, असे म्हटले. राज्यसभेत 11 ऑगस्ट रोजी मोठा गदारोळ झाला होता.
या सदस्यांवर झाली कारवाई
इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), फुलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), , रिपुन बोरा (काँग्रेस), , बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राजमणी पटेल (काँग्रेस), , डोला सेन (काँग्रेस), , शांता छेत्री (काँग्रेस), , सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस) , प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)
विरोधी पक्षांकडून संयुक्त निवेदन जारी
निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात विरोधी पक्षांनी 12 खासदारांच्या निलंबनाचा निषेध करत हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी 12 खासदारांच्या निलंबनप्रकरणी मंगळवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जिन खरगे यांच्या कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत निलंबनाच्या कारवाईवर पुढे पाऊलं उचलण्याबाबत चर्चा करण्यात येईल. मात्र, या संयुक्त निवेदनात तृणमूल काँग्रेस सहभागी नाही. तृणमूल काँग्रेसच्याही दोन खासदारांचं निलंबन करण्यात आलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
PM Modi : सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार; पंतप्रधान मोदींची ग्वाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)