Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेवर गुन्हा दाखल करून अटक करा, अन्यथा उच्च न्यायालयात आपण धाव घेणार; गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा, म्हणाले...
Gunaratna Sadavarte : मनोज जरांगेवर गुन्हा दाखल करून अटक करा, अन्यथा उच्च न्यायालयात आपण धाव घेणार; गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा, म्हणाले...

Gunaratna Sadavarte on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. दरम्यान या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा पवित्र घेतला आहे. जरांगे राजकारणासाठी सरकारला ब्लॅकमेल करत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. जर जरांगेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली नाही, तर माननीय उच्च न्यायालयात आपण धाव घेणार, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना मुंबईत 29 तारखेला आंदोलन (Maratha Morcha in Mumbai) करू देण्यात येऊ नये, कारण सदर आंदोलन ही मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकारण आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. त्यामुळे त्वरित त्यांना थांबवा. गुन्हा दाखल करा. अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केली आहे.
मनोज जरांगेना धार्मिक तेढ निर्माण करायची आहे - गुणरत्न सदावर्ते
मी कुठली विनंती करणार नाही, कारण कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. आंतरवाली सराटीमध्ये जे काही झालं, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही हे करत आहोत. जरांगेना धार्मिक तेढ निर्माण करायची आहे. ते म्हणतात मुंबईत घुसू आणि गणपती बाप्पा घेऊन घुसू. म्हणजे त्यांना धर्ममध्ये आणायचा आहे. जमेल तसं घुसा ही कोणती भाषा, संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते काय बोलताय की दंगल घडून आणणार. तुम्ही जे शब्द उच्चारता त्यातून कळते की तुमची नीती योग्य नाही.
मुंबईत जरांगेंना येऊ देऊ नका, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही- गुणरत्न सदावर्ते
पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मी थोड्या वेळात आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल करणार आहे. मुंबईत जरांगेंना येऊ देऊ नका, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. यासाठी तक्रार द्यायला सुद्धा जात आहे. राजकीय हितापोटीची माणस पुढे येतात, त्यांना थांबवण्याची गरज आहे. जर एखादा निकाल न्यायालयाने दिला असेल त्याच्या विरोधात कोणालाही जाता येत नाही. जर जरांगे मुंबईत आले तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. त्याला सहा महिन्याची शिक्षा आहे. असेही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा:

























