Dhule Rain : धुळे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, सततच्या पावसामुळं पिकं धोक्यात, शेतकरी चिंतेत
धुळे (Dhule) जिल्ह्यातही जोरदर पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे.
Dhule Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी नाल्यांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातही जोरदर पाऊस सुरु आहे. या सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे. सततच्या पावसामुळं शेती पिकं पिवळी पडत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसानं कपाशी, मका, बाजरी, मूग, उडीद आणि मिरची या पिकामध्ये पाणी साचल्यानं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्यानं पिकं पडली पिवळी
धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे, वेल्हाणे, हडसुने आदी गावात सतत पाऊस पडत आहे. या पावसानं बहरलेल्या पिकामध्ये पाणी साचले आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्यानं पिकं पिवळी पडू लागली आहेत. आतापर्यंत झालेल्या सततच्या पावसानं मिरची पिके सडली आहेत. जिल्ह्यात यंदा तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीनचे देखील मोठ्या प्रमाणावर पीक घेतले आहे. मात्र सततच्या सुरु असलेल्या पावसामुळं पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या राज्यात सुरु असलेला पाऊस काही पिकांना फायद्याचा ठरत आहे. तर काही पिकांना नुकसानकारक ठरत आहे. सततच्या पावसाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. पिकं पिवळी पडून लागल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळ शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, हवामान विभागानं या महिन्यात देखील चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुलं आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मुंबईसह ठाणे, पुणे नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत (Mumbai) देखील जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: