अभिनव कश्यपची फेसबूक पोस्ट व्हायरल; सलमान खान आणि यशराज फिल्म्सवर गंभीर आरोप
दबंगचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. सलमान खानमुळे काम मिळणं बंद झाल्याचा आरोपही त्याने केला आहे.
मुंबई : सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडमधील घराण्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनुराग कश्यपचा भाऊ आणि दबंगचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने फेसबुकवर पोस्ट लिहून बॉलिवूड कंपूवर टीका केली आहे. त्याचा सगळा रोख सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियावर आहे. सलमान खानमुळे काम मिळणं बंद झाल्याचा आरोप त्याने केला आहे. दबंग तुफान हिट झाल्यावर अभिनव दंबग- 2 चं देखील दिग्दर्शन करणार होता. पण काही कारणाने त्याने नकार दिला होता.
अभिनव सिहं कश्यपने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, बॉलिवूडमधील मोठे मोठे प्रोडक्शन हाऊस आणि कास्टिंग डायरेक्टर्स एकमेकांना मिळालेले आहेत. हे लोक मिळून बॉलिवूडमध्ये नव्याने आलेल्या कलाकारांचं करिअर बनवतात आणि बिघडवतातही. मोठे प्रोडक्शन हाऊस, मोठे बॅनर्स, मोठे कलाकार स्ट्रगलर्स आणि नवीन कलाकारांना इतकं असहाय्य करतात की त्यांना पर्याय न उरल्याने देहविक्रीच्या मार्गावरही जावं लागतं.
अभिनवने यशराज फिल्म्सवर गंभीर आरोप करत म्हटलं की, कदाचित या एजन्सीनेच सुशांतसिंग राजपूतला हे पाऊल उचलण्यास भाग पाडलं. या अँगलनेही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अशी एजन्सी एखाद्या कलाकाराची कारकीर्द बनवते, परंतु ती खराबही करते. सुशांतच्या आत्महत्येमुळे फिल्म इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. एखाद्याला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यामागील नेमके कारण काय असू शकते? सुशांतच्या मृत्यूमुळे #Metoo मोहिम सुरु होते की काय याची मला भीती वाटते.
अभिनवने सलमान खान आणि त्याच्या कुटुबियांवर गंभीर आरोप केले आहेत. दबंग सिनेमाच्या रिलीजनंतर सलमान खानने सोहेल खान आणि अरबाज खान यांच्यासोबत मिळून 'बेशरम' सिनेमा रिलीज होणे थांबवण्यापासून ते सिनेमाचे राईट्सबाबतची अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्ना केला.
अभिनवने लिहिलं की, माझा अनुभव या सर्व गोष्टींपेक्षा वेगळा नाही. मलाही शोषणाचा सामना करावा लागला आहे. दहा वर्षांपूर्वी दबंग 2 मधून मी बाहेर पडण्याचे कारण म्हणजे अरबाज खान आणि सोहेल खान यांनी माझ्या कारकिर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी खूप घाबरलो. अरबाजने खाने माझा श्री अष्टाविनायक फिल्म्समधील दुसरा प्रोजेक्टमध्ये अडथळे निर्माण केले. माझा कारकिर्दिवर मोठा परिणाम होण्याची धमकीही मला देण्यात आली. त्यानंतर मी श्री अष्टाविनायक फिल्म्सला पैसे परत दिले आणि त्यानंतर मी व्हायकॉम पिक्चर्सकडे गेलो. तिथेही तोच अनुभव आला. त्यानंतर रिलायन्स एंटरटेनमेंट मला वाचवण्यासाठी पुढे आली आणि आम्ही भागीदारीत 'बेशरम' चित्रपटावर काम केले.
सुशांत सिंह राजपूत कोणत्या परिस्थितीतून जात असेल त्याचा अभिनवला कल्पना आहे. मात्र सुशांत प्रमाणे मी हार मानणार नाही, असंही अभिनवने म्हटलं. मीटू प्रमाणे बॉलिवूडमधील मोठे बॅनर संपूर्ण इंडस्ट्रीला कंट्रोल करते, असंही त्याने म्हटलं.