एक्स्प्लोर

ठाकरे गट Vs शिंदे गट! शिरसाटांच्या प्रतिमेला जोडे मारो केल्याने शिवसेना महिला आघाडी पोलिसात जाणार

Chhatrapati Sambhaji Nagar : शिरसाट यांच्या वक्तव्यावरून आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद आता विकोपाला गेला आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विषयी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान शिरसाट यांच्या विरोधात मंगळवारी ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. त्यामुळे आता शिंदे गटाच्या महिला आघाडी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर आज (29 मार्च) रोजी साडेअकरा वाजता शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार आहे. तसेच शिरसाट यांच्याविरुद्ध जोडे मारो आंदोलन करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करणार आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या वक्तव्यावरून आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद आता विकोपाला गेला आहे. 

सुषमा अंधारे यांच्याबद्दल आमदार संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी शिरसाट यांच्या फोटोला ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिरसाट यांच्या विधानामुळे ठाकरे गटाच्या महिला आघाडीमध्ये असंतोष देखील पाहायला मिळाला. त्यामुळे ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शहरातील क्रांती चौकात आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. तर शिरसाट यांच्या फोटोला जोडे मारून,  यावेळी संजय शिरसाठ यांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय.... मिंधे सरकार हाय, हाय, ….शिंदे सरकार करायचं काय,खाली मुंडके वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या.  त्यामुळे आता शिरसाट समर्थक आणि शिंदे गटाच्या महिला आघाडी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. 

पोलीस आयुक्तांची भेट घेणार... 

सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून होणाऱ्या आरोपाला खुद्द आमदार शिरसाट यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन, उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडी आज शहर पोलीस आयुक्तांची साडेअकरा वाजेच्या सुमारास भेट घेणार आहे. तसेच शिरसाट यांच्याविरुद्ध मंगळवारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनकर्ते महिला कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्त यांच्याकडे करणार आहेत. 

अन्यथा राजीनामा द्यायला तयार...

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल 'अश्लील' वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र  सर्व आरोप शिरसाट यांनी फेटाळून लावले आहे. मी केलेल्या भाषणात कुठेही 'अश्लील' वक्तव्य आल्याचे दाखवून दिल्यास, मी स्वतः हून माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. तर उगाच माझ्यावर खोटे आरोप केल्यास जशास तसेच उत्तर मिळेल, त्यासाठी माझी आमदारकी गेली तरीही चालेल असेही शिरसाट म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare : 48 तासांत संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करा; ठाकरे गटाचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget