Sushma Andhare : 48 तासांत संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करा; ठाकरे गटाचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात
ठाकरे गटाचं शिष्टमंडळ संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे निवेदन घेऊन गेलं आहे. त्यांनी 48 तासांत संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Sushma Andhare : शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sanjay andhare) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावरुन आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचं शिष्टठमंडळ तक्रार दाखल करण्यासाठी थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे निवेदन घेऊन गेलं आहे. त्यांनी 48 तासांत संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुषमा अंधारे या सुसंस्कृत आहेत. भाऊ या स्वरुपात त्या बोलतात. त्या संस्कारी आणि अभ्यासूदेखील आहेत. भावाबद्दल बहिणीच्या नात्याने चांगलं वक्तव्य त्या करत असतात. मात्र, संजय शिरसाट यांनी अपशब्द वापरुन सुषमा अंधारे यांची खिल्ली उडवली. मात्र सुषमा अंधारे यांनी बहिण-भावाचं नातं जोडून त्यांनी वक्तव्य केलं होतं. शिवसेनेचं नेतृत्व सभ्य आणि सुसंस्कृत आहे. उद्धव ठाकरेंची शिकवण आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रत्येक नेते एकमेकांना बहिण-भावाच्या नात्याने बघतो, असं शिष्टमंडळाचं म्हणणं आहे.
महिला आयोगाने पोलिसांकडून व्हिडीओ मागवले...
शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची दखल घेत सुषमा अंधारेंबाबत केलेल्या वक्तव्याचे व्हिडीओ महिलां आयोगाने पोलिसांकडून मागवून घेतले आहेत. तातडीने कारवाई करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे केली आहे.
सुषमा अंधारे या त्यांच्या अनेक सभेतून विरोधकांवर जहरी टीका करत असतात. अनेक भाषणात त्यांनी आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. त्यावरुन संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. संभाजीनगरमध्ये बोलत असताना त्यांची जीभ घसरली. या वक्तव्यामुळे आता संजय शिरसाट अचडणीत येण्याची शक्यता आहे. जोपर्यंत शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. शिवसेनेत आमचं आयुष्य गेलं आहे. आम्ही शिवसेनेत अनेक वर्ष घालवली आहेत आणि आता नवीन आलेले लोक आम्हाला मार्गदर्शन करत आहेत' असे शिरसाट व्हिडीओत म्हणाले होते.
कुणाचीही माफी मागणार नाही; संजय शिरसाट
जो व्हिडिओ माझा फिरतोय त्यात मी काय अश्लील बोललो असेल तर आमदारकीचा तातडीने राजीनामा देईन. तुम्हाला लढायचं तर समोर या, माझा बद्दल मी काहीही खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देणार गेली उडत ती आमदारकी.
संजय शिरसाठ कधीही शब्दावर फिरवत नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे मी कुणाचीही माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.