मोठी बातमी! मध्य रेल्वेची नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत; मलकापूर रेल्वे स्टेशन वर मालगाडीचे दोन डब्बे घसरले
Buldhana News: मुंबई- नागपूर दरम्यान रात्रीच्या सुमारास मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना घडलीय. परिणामी नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

बुलढाणा : मुंबई- नागपूर दरम्यान रात्रीच्या सुमारास मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना घडलीय. परिणामी नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे विभागाने युद्ध पातळीवर काम सुरु करून घसरलेले डब्बे रुळावर ठेवण्यात यश आले आहे. मात्र रुळ बदलणारी यंत्रणेत बिघाड झाला आहे, ते काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. काही तासात मध्यरेल्वे डाऊनची सेवा पूर्ववत सुरु होईल, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. मात्र या दुर्घटनेमुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दुसरीकडे एचनाक मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून नेमके कसे काय घसरले? हे अद्याप कळू शकलेलं नाही.
महिलेची सोनपोत लांबवणाऱ्या दोघांना बेड्या, 2 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त
रावेर : वाघोड फाटा वरून रस्त्यावरून पायी जात असलेल्या वाघोड येथील रहिवासी शोभा सुरेश पाटील ही महिला रस्त्यावर एकटी जात असतांनाच महिलेजवळ दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी खिरवड रस्ता विचारण्याचा बहाणा करून तिच्या डोळ्यात माती फेकली आणि गळ्यातील सोन्याची पोत जबरीने ओरबाडली. यातील दोन्ही आरोपींना अंतुर्ली शिवारात सापळा रचून पोलिसांनी पकडले. दरम्यान या दोघांना रावेर न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाघोड गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यावर संशयित आरोपींच्या रावेर शहरातील रेकी मोहिमेची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील शेती शिवारात सापळा रचला. अंतुर्ली शिवारात झडपघालून आरोपी मोटारसायकलवर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रावेर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग करून त्यांची मुसक्या आवळल्या. अजय गजानन बेलदार (वय 20) व नरेंद्र उर्फ नीलेश अशोक बेलदार (वय 20), दोघेही अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी कबुली दिली आहे,
2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
जप्त 2 लाखांचा मुद्देमाल दोन्ही आरोपींकडून 75 हजारांची मोटारसायकल आणि 1 लाख 75 हजार रुपयांचे 13 ग्रॅम वजनाचे सोने असा तब्बल 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सायबर क्राइम पोलिस कॉ. मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी तपासासाठी मदत केली. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार तुषार पाटील करीत आहेत.
ही बातमी वाचा:
























