(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशात, अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर हे पोलिसांच्या वेशात आले आहेत.
Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध प्रश्नावरुन स्वभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर हे पोलिसांच्या वेशात आले आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं आहे. सध्या पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
10 फेब्रुवारीपर्यंत रविकांत तुपकरांनी सरकारला दिला होता अल्टिमेटम
कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Pik Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर आक्रमक (Ravikant Tupkar) झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून तुपकर हे भूमिगत होते. त्यांची पोलिसांकडून शोधाशोध सुरु होती. दरम्यान, त्यांनी कापूस सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात सरकारला 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला होता. तो अल्टिमेटम संपला होता. आहे. त्यामुळं आज रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबईच्या AIC पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
आज तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 11 फेब्रुवारीला हजारो शेतकरी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जमले आहेत . एकतर आम्हाला आत्मदहन करु द्या, नाहीतर पोलिसांच्या बंदुकांच्या गोळ्यांनी आम्हाला शहीद करा. आमचं जगण मान्य करा नाहीतर आम्हाला मारुन टाका अशी आमची भूमिका असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता.
soybean cotton : कापूस सोयाबीनला दरवाढ नाही, पीक विमा मिळाला नाही
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याच तुपकरांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: