Beed News: त्यामुळेच गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाला विरोध केला; जलील यांनी प्रीतम मुंडेंच्या समोरच सांगितला किस्सा
Beed News: छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विरोध का केला, याचा खुलासा खासदार इम्तियाज जलील यांनी केला .
Beed News: बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी एमआयएमचे खासदार यांच्या इम्तियाज जलील (AIMIM Imtiaz Jaleel ) आणि भाजप नेत्या, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) एकाच मंचावर आले होते. दरम्यान यावेळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या स्मारकाला आपण का विरोध केला याचा खुलासा जलील यांनी याच व्यासपीठावर केला. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालयाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची इच्छा असल्याचं देखील यावेळी जलील यांनी बोलावून दाखवलं.
बीडमध्ये 'व्हाईस ऑफ मीडिया' या पत्रकारांच्या संघटनेकडून मराठवाडा अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले होते. याच अधिवेशनाला छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची मागणी होत असताना, जलील यांनी थेट विरोध केला होता. दरम्यान तो विरोध कशासाठी केला होता, हाच किस्सा त्यांनी आज बीडमध्ये या कार्यक्रमात सांगितला. विशेष म्हणजे यावेळी स्वतः खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या.
तर यावेळी बोलताना जलील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारला असता तर हे त्यांना देखील आवडलं नसतं. त्यामुळे मी न्यायालयात एक याचिका दाखल केली. तसेच गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक न उभारता त्या ठिकाणी रुग्णालय किंवा शाळा उभारण्याची मागणी केली आणि त्यानंतर आता त्याच नियोजित जागेवर 400 खाटांचे एक सुसज्ज रुग्णालय उभा राहत आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यासाठी देखील आपण त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असल्याचं जलील म्हणाले.
मेरे शहर मे मुझे तो डाकूओ ने घेरा है!
पुढे बोलताना जलील म्हणाले की, पत्रकार होतो म्हणून मला खासदार होता आलं. अपघाताने एकदा आमदार झालो होतो. आता मात्र माझ्या शहरामध्ये मला सर्व डाकूंनी घेरलेलं आहे. त्यामुळे 2024 ला जर पराभव झाला, तर मी पुन्हा एकदा पत्रकारिता क्षेत्रात जाईल असं देखील यावेळी इम्तियाज जलील या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.
मोदीजी कभी तो हमारे दिल की बात भी सुनो!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रम असल्यामुळे खासदार प्रीतम मुंडे यांना या कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला. यावरूनच इम्तियाज जलील यांनी मोदीजींनी कधीतरी आमच्या देखील मनातलं पाहिले पाहिजे. विशेष म्हणजे पत्रकारांच्या मनात जे आहेत ते देखील त्यांनी एकदा ऐकावं असं जलील म्हणाले.
माध्यमांनी सनसनाटी पॅटर्न राबू नयेत: प्रीतम मुंडे
पत्रकार संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रीतम मुंडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांचा दर्जा घसरत चालला असल्याचं म्हटले. तसेच स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर सनसनाटी पॅटर्न माध्यमांनी राबवू नयेत. त्याचबरोबर जशा माध्यमांच्या प्रेक्षकांकडून अपेक्षा असतात, तशाच अपेक्षा राजकीय नेते माध्यमांकडे ठेवतात. त्यामुळे माध्यमांमध्ये दर्जेदार पण असला पाहिजे असे देखील प्रीतम मुंडे म्हणाल्या.