Fake Currency : बार्शी बनावट नोटा प्रकरणाचे बीड कनेक्शन; चार आरोपींना बीडमधून अटक, प्रकरणाचा तपास सुरू
Beed Fake Currency: बार्शी पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट पकडलं असून सात जणांना अटक केली आहे. त्यामधील चार जणांना बीडमधून अटक करण्यात आली आहे.
![Fake Currency : बार्शी बनावट नोटा प्रकरणाचे बीड कनेक्शन; चार आरोपींना बीडमधून अटक, प्रकरणाचा तपास सुरू barshi fake note case four accused arrested from beed investigation into the case Fake Currency : बार्शी बनावट नोटा प्रकरणाचे बीड कनेक्शन; चार आरोपींना बीडमधून अटक, प्रकरणाचा तपास सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/d036eee10e01bdbe4d12199d42af9b8a1689994863601666_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Beed Fake Currency : बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या टोळीतील आरोपींकडून पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये चार आरोपींना हे बीडच्या परळी आणि अंबाजोगाईतून अटक करण्यात आले आहेत.
बार्शी शहरातील मिरगणे कॉम्प्लेक्स गाळ्यातील एका व्यापाऱ्याकडे दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
सुनील चंद्रसेन कोथंबीर याला अंबाजोगाई मधून अटक करण्यात आली आहे तर आदित्य धनंजय सातभाई या आरोपीला परळीच्या गांधी मार्केट या ठिकाणाहून पोलिसांनी अटक केली. तर या दोघांकडे देखील दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना आढळून आल्या आहेत. या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता नितीन बागाडे आणि नाशिक येथील जमीर सय्यद यांच्याकडून या बनावट नोटा घेतल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी नितीन बागडे आणि जमीर सय्यद या दोघांना देखील अटक केली आहे.
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या या सर्व आरोपींकडे पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केली. त्यामध्ये या सर्व नोटा मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटे गावच्या एका तरुणाच्या घरामध्ये प्रिंट करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ललित चंद्रशेखर होरा याच्या घरावर छापा टाकला असता यावेळी तिथे 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा, एक कलर प्रिंटर कटर पट्टी यासह नोटा बनवण्याचे इतर साहित्य पोलिसांनी जप्त केल आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी आतापर्यंत चार लाख रुपयांच्या नोटा जप्त केले असून सात आरोपींना अटक केली आहे. बनावट नोटा छापण्याचं हे रॅकेट महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचल आहे याचा देखील तपास पोलीस करत आहेत.
बार्शीतील मिरगणे कॉम्प्लेक्स गाळ्यातील व्यापाऱ्यांकडे दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती 19 जुलैला बार्शी शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं आणि हे बनावट रॅकेट समोर आलं.
संबंधित बातमी:
- Solapur Crime: घरात चालायचा बनावट नोटांचा छापखाना, बार्शी शहर पोलिसांनी उघड केलं रॅकेट, सात जण अटकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)