एक्स्प्लोर

Solapur Crime: घरात चालायचा बनावट नोटांचा छापखाना, बार्शी शहर पोलिसांनी उघड केलं रॅकेट, सात जण अटकेत

Barshi Crime News : परळी, आंबेजोगाई, कराड, नाशिक, मोहोळ अशा विविध ठिकाणच्या सात जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

Barshi Crime News : बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून टोळीतील सात जणांना बार्शी शहर पोलिसांनी अटक केली आहे. मिरगणे कॉम्प्लेक्स गाळ्यातील व्यापाऱ्यांकडे दोन व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती 19 जुलैला बार्शी शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं. 

सुनील चंद्रसेन कोथिंबिरे (वय 23, रा. माळी नगर, अंबाजोगाई, जि. बीड) आणि आदित्य धनंजय सातभाई (वय 22 रा. स्टेशन रोड, गांधी मार्केट, परळी वैजिनाथ जि. बीड) या दोघांना शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. या संशयित आरोपीकडे दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर खदीर जमाल शेख (वय 31 रा. मिरवट, ता. परळी, जि. बीड), विजय सुधाकर वाघमारे (वय 32, रा. स्टेशन रोड, गांधी मार्केट, परळी, जि. बीड) यांच्याकडून या नोटा घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे सहा हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढलून आल्या. त्यामुळे पोलिसांनी यांना देखील अटक केली.

या आरोपीची चौकशी केली असता त्यांनी या बनावट नोटा नितीन ऊर्फ आप्पा जगन्नाथ बगाडे (वय 50, रा. शामगाव, ता. कराड, जि. सातारा), जमीर मोहमंद सय्यद (वय 40, रा. नाशिक रोड, सिन्नर फाटा, नाशिक) यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. मात्र आतापर्यंत या नोटा कुठे छापण्यात येतात याची माहिती पोलिसांनी मिळाली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतेलेल्या या सर्व आरोपीची कसून चौकशी केली.

तेव्हा या बनावट नोटा मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटी गावच्या तरुणाच्या घरात या नोटा प्रीटिंग करत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ येथील ललित चंद्रशेखर व्होरा (वय 26, रा. चिंचोलीकाटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी तेथे 80 हजार रुपयांच्या नोटा, एच. पी. कलर प्रिंटर, कटर, पट्टी, कागदावर बनवलेल्या अर्धवट नोटा तसेच नोटा बनवण्याचे इतर साहित्य सापडले. त्यामुळे पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करत आरोपी ललित व्होरा याला देखील अटक केली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी जवळपास 4 लाख रुपयांचा नोटा जप्त केल्या आतापर्यंत 7 आरोपीना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अटक केलेल्या सात पैकी तिघे आरोपी हे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत. एक आरोपी अंबेजोगाईचा, एकजण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याचा, एकजण नाशिक जिल्हा आणि एकजण मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटीचा असे वेगवेगळ्या जिल्ह्यातील आरोपी असल्याने त्यात आणखी कितीजण सामील आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget