Maruti Gift : मारूती कारकडून ग्राहकांसाठी खुशखबर! केवळ 500 रूपयांत दिली 'ही' खास भेट
Maruti Gift : मारुती सुझुकीच्या ग्राहकांनी आता घाबरण्याची गरज नाही. कारण मारूतीकडून एका खास पॅकेजची सुविधा करण्यात आली आहे.
Maruti Gift : मारुती आपल्या ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. मारुती सुझुकी इंडियाने (MSI) हायड्रोस्टॅटिक लॉक (इंजिनमध्ये पाणी शिरणे) आणि भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन निकामी होणे किंवा थांबणे याची काळजी घेण्यासाठी ग्राहकांसाठी खास 'कव्हर' जाहीर केले आहे.
मारूतीने जाहीर केले CCP :
देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात मोठ्या कार कंपनीने ग्राहकांबरोबर विक्रीनंतरची सेवा अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्राहक सुविधा पॅकेज (CCP) सादर केले आहे. या पॅकेजअंतर्गत वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने किंवा चुकीच्या तसेच भेसळयुक्त इंधनामुळे होणारे नुकसान भरून काढले जाणार आहे.
ग्राहकांसाठी नवीन सेवा :
मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (Service) पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने आणि भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन बंद पडण्याच्या किंवा बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बॅनर्जी म्हणाले, "अशा परिस्थितीत ग्राहकांनी आता घाबरून जाण्याची गरज नाही. अर्थातच, ग्राहकांनी पाणी साचलेल्या रस्त्यांपासून त्यांचे वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु इंजिनमध्ये काही बिघाड असल्यास आम्ही त्याची काळजी घेऊ."
या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नाममात्र रक्कम भरावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. वॅगनार आणि अल्टोच्या ग्राहकांसाठी ही रक्कम सुमारे 500 रुपये असेल. अशाप्रकारे, केवळ 500 रुपयांची ही भेट ग्राहकांना त्यांची कार सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.
महत्वाच्या बातम्या :
- Toyota Mirai Launch: पेट्रोल, डिझेल नाही ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार समोर, टोयाटोच्या मिराई कारचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन
- RE Scram 411 vs Himalayan: रॉयल एनफिल्डची Scram 411 की हिमालयन? कोणती बाईक तुमच्यासाठी योग्य?
- Electric Vehicle Policy : मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचं उद्दिष्ट; पाच हजार चार्जिंग स्टेशन्स!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha