(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Car : ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार घेणं फायदेशीर की घातक? सोप्या भाषेत समजून घ्या फरक
Automatic Transmission : जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल ट्रान्समिशनबद्दल गोंधळात असाल, तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Automatic Transmission vs Manual Transmission : अनेक कार निर्मात्या कंपन्या वेळ आणि मागणी पाहून आपल्या वाहनांमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्य अपडेट करत असतात. ऑटोमॅटिक फीचर हे देखील असेच एक कारचं वैशिष्ट्य आहे. या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हालाही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार घ्यायची असेल, तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारचे फायदे
जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार असेल तर तुम्हाला गाडी चालवताना गीअर्स बदलण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारच्या वेगानुसार आणि इंजिनच्या गरजेनुसार गीअर्स आपोआप बदलते. यामुळे इंजिन देखील चांगला प्रतिसाद देते आणि तुम्हाला ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव मिळतो.
तर ऑटोमॅटिक कार मॅन्युअलपेक्षा सुरक्षित मानले जाते. जर तुमच्याकडे मॅन्युअल ट्रान्समिशन कार असेल, तर तुम्हाला स्टीयरिंग व्हीलवरून हात काढून क्लच दाबण्यासाठी पायांचा वापर करावा लागतो. ज्यामुळे तुमचं लक्ष विचलित होते. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये गीअर आपोआप बदलतो. ज्यांना कार चालवता येत नाही पण शिकायचं आहे अशा लोकांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार आणखी चांगल्या आहेत. यामध्ये त्यांना गियर लावण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळते.
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारचे तोटे
मॅन्युअल कारच्या तुलनेत कारमधील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन शिफ्ट होण्यास वेळ लागतो, तसेच गीअर्स शिफ्ट करताना स्वच्छ वाटते. त्याच वेळी, ऑटोमॅटिक कार देखील मॅन्युअल कारपेक्षा महाग आहेत. याशिवाय मॅन्युअल कारच्या तुलनेत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारची मेंटेनन्स अधिक आहे. मायलेजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, दोन्ही ट्रान्समिशनच्या कार सामान्य आहेत.
ऑटोमॅटिक गाड्यांमध्ये कधी-कधी अनावश्यक आवाज ऐकू येतो, कधी लिक्विड लिकेजची समस्या देखील होऊ शकते, कधी जळल्यासारखा वास येऊ लागतो. अशा वेळी कार सर्विसिंग आणि मेंटेनन्सची गरज आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :