BH Series Number Plate: गाड्यांची BH सीरीज नंबर प्लेट होत आहेत खूप लोकप्रिय, तुम्हाला हवी असल्यास, असं करा अप्लाय
Bharat Series Registration: भारतातील (Indian) संरक्षण कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना (central employees) त्यांच्या नोकऱ्यांमुळे (Jobs) अनेकदा बदल्यांचा सामना करावा लागतो.
Bharat Series Registration: भारतातील (Indian) संरक्षण कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना (central employees) त्यांच्या नोकऱ्यांमुळे (Jobs) अनेकदा बदल्यांचा सामना करावा लागतो. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली झाल्याने त्यांना त्यांच्या वाहनामुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. याचं कारण वाहनाची नोंदणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करणे अत्यंत अवघड आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, 2021 मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry of Road Transport and Highways)अशा वाहनांसाठी बीएच सीरीज म्हणजेच भारत सीरीजच्या नंबर प्लेट जारी करण्यास सुरुवात केली आहे.
Bharat Series Registration: ही सुविधा प्रत्येकासाठी नाही
बीएच नंबर प्लेट्समुळे भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात मोठा बदल झाला आहे. मात्र ही नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी नाही. तुमच्या वाहनासाठी ही नंबर प्लेट मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही विशिष्ट पात्रता असणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत ही नोंदणी प्लेट काही निवडक लोकांसाठीच उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या वाहनासाठी ही नोंदणी जारी केली जाते आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकता हे सांगणार आहोत.
Bharat Series Registration: या लोकांना हा नंबर मिळतो
राज्य आणि केंद्र सरकारमधील (central government) संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, ज्यांच्याकडे अशा नोकऱ्या आहेत, ज्यांची अनेक वेळा बदली झाली आहे, त्यांनाच ही प्लेट मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त सर्व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी ज्यांची कार्यालये चार पेक्षा जास्त राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत ते देखील त्यांच्या खाजगी वाहनांसाठी BH नोंदणी प्राप्त करण्यास पात्र आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ...
Step 1: यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी वाहन विक्रेता खरेदीदाराच्या वतीने वाहन पोर्टलवर ऑनलाइन फॉर्म भरेल.
Step 2: त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. डीलर सर्व आवश्यक कागदपत्रे भरेल आणि त्यासाठी आवश्यक शुल्क किंवा मोटार वाहन कर भरेल.
Step 3: यासाठी ओनलाईन पैसे भरा.
Step 4: यानंतर तुम्हाला आरटीओकडून मंजुरी मिळेल.
दरम्यान, जे व्यक्ती आपल्या कामासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करत असतात त्यांच्यासाठी ही नंबर प्लेट घेणं आरामदायी ठरू शकते.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: