(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hyundai Tucson Price : Hyundai Tucson च्या किंमतीची उत्सुकता, लवकरच अनावरण, अधिकृत बुकिंग सुरू
Hyundai Tucson Price : Hyundai ने आजपासून बहुप्रतिक्षित SUV Tucson कारची बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
Hyundai Tucson Price : Hyundai ने आजपासून तिची बहुप्रतिक्षित SUV Tucson चे बुकिंग सुरु केले आहे. कंपनी 4 ऑगस्ट 2022 रोजी त्याच्या किमती जाहीर करेल. 50,000 रुपये टोकन रक्कम भरून बुकिंग करता येते. या कारशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्या
Hyundai Tucson SUV इंजिन
भारतात, Hyundai Tucson पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध असणारी कार लॉन्च करण्यात आली आहे. 2.0-लिटर पेट्रोल इंजिन 156 PS पॉवर आणि 192 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. त्याच वेळी, 2.0-लिटर डिझेल इंजिन 186 PS पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरेट करेल. हे दोन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध असेल, एक 6-स्पीड आणि दुसरा 8-स्पीड. या कारच्या टॉप मॉडेलमध्ये ऑल-व्हील-ड्राइव्ह वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. 10.25-इंच टचस्क्रीनसह, 2022 Hyundai Tucson ला संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच 360-डिग्री कॅमेरा, हवेशीर जागा, बोस ऑडिओसह वायरलेस चार्जरदेखील उपलब्ध असणार आहे.
Hyundai Tucson ची किंमत काय असेल?
Hyundai 4 ऑगस्ट 2022 रोजी Tucson च्या किमती जाहीर करण्यात येईल त्याची किंमत 25 लाख ते 30 लाखांच्या दरम्यान ठेवण्याचा अंदाज कंपनीकडून वर्तवला जात आहे. बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर, ही एसयूव्ही देशाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठेतील सिट्रोएन सी5, जीप कंपास आणि फोक्सवॅगन टिगुआन सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.
Hyundai Tucson SUV 60 पेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज
2022 Hyundai Tucson अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. Hyundai Tucson SUV 60 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह येईल. ज्यामध्ये कारच्या बेस व्हेरियंटमध्ये 45 फीचर्स मिळणार आहेत. यात हिल स्टार्ट-स्टॉप असिस्ट, 6 एअरबॅग्ज, ESC/VSM आणि लेव्हल 2 ADAS आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- BMW G 310 RR स्पोर्ट्स बाईक भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
- Nissan ने लॉन्च केली आपली नवीन SUV, आकर्षक लूकसह मिळणार हे फीचर्स
- Grand Vitara : मारुती Grand Vitara चा धमाकेदार टीझर झाला रिलीज; 'हे' फिचर असेल खास