(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grand Vitara : मारुती Grand Vitara चा धमाकेदार टीझर झाला रिलीज; 'हे' फिचर असेल खास
Maruti Suzuki Grand Vitara : मारूती सुझुकी कंपनीने आपला नवीन ग्रँड विटारा (Grand Vitara) लाँच करण्यापूर्वी टीझर लॉन्च केला आहे.
Maruti Suzuki Grand Vitara : मारूती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने आपली नवीन कार ग्रँड विटारा (Grand Vitara) लाँच करण्यापूर्वी टीझर लॉन्च केला आहे. 20 जुलै 2022 रोजी लॉन्च होणार्या ग्रँड विटारासाठी कंपनीने आधीच बुकिंग सुरु केली आहे. टोयोटा अर्बन क्रूझर हायराडरचे दुसरे मॉडेल, नवीन ग्रँड विटारा सौम्य हायब्रिड पेट्रोल आणि हायब्रिड पॉवरट्रेनमध्ये देखील उपलब्ध असेल. तसेच, ऑल-व्हील ड्राईव्ह देखील उपलब्ध असणे अपेक्षित आहे. टोयोटा हायरायडर आणि ग्रँड विटारा हे दोन्ही मॉडेल्स एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित असले तरी, मारुतीने दोन्ही गाड्यांमध्ये फरक दिसण्यासाठी काही बदल केले आहेत.
ग्रँड विटाराचे डिझाईन :
ग्रॅंड विटाराचे स्प्लिट हेडलॅम्प डिझाईन कायम ठेवण्यात आल्याचे कंपनीने दाखवलेल्या टीझरमध्ये दिसून येते. तर बंपर, ग्रिल आणि डीआरएल क्लस्टर ग्रँड विटारामधील टोयोटा हायरायडरपासून वेगळे ठेवण्यात आले आहेत. याला नवीन तीन-डॉट पॅटर्न LED DRL डिझाईन देण्यात आले आहे. जे या आधीच्या बॅलेनो हॅचबॅकमध्ये दाखविण्यात आले होते. SUV ला उच्च-सेट DRLs दरम्यान क्रोम आणि गडद प्लास्टिकचा एक छोटा बँड मिळतो. मागील बाजूस, ग्रँड विटाराला एक वेगळी टेल-लॅम्प डिझाईन देण्यात आली आहे.
ग्रँड विटारामध्ये लक्झरी केबिन उपलब्ध असेल
केबिनच्या डिझाईनबाबत टीझरमध्ये सध्या तरी कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, हैदरमध्ये सापडलेल्या केबिनपेक्षा ते फारसे वेगळे नसेल, अशी अपेक्षा आहे. Grand Vitara ला मारुतीच्या SmartPlay Pro+ सह डॅशबोर्डवर फॅब्रिक किंवा लेदर इन्सर्टसह आणि प्रीमियम फीलसाठी दारांसह 9.0-इंचाची सेंट्रल टचस्क्रीन देखील मिळू शकते. मारुती या एसयूव्हीसह (SUV) भारतातील त्यांच्या कोणत्याही वाहनांना पॅनोरॅमिक सनरूफ देणे सुरू करू शकते.
ग्रँड विटाराचे इंजिन :
मारुती ग्रँड विटारा मानक पेट्रोल आणि हायब्रिड इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. सध्या स्टँडर्ड पेट्रोल एसयूव्ही आणि इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रीड या दोन्ही ऑप्शनमध्ये बुक केले जाऊ शकतात. मानक SUV ला 100 bhp 1.5-litre K-Series mild-hybrid पेट्रोल इंजिन मिळेल, तर Intelligent Electric Hybrid ला इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी पॅकसह 1.5-लीटर इंजिन मिळेल, जे 113 bhp पॉवर जनरेट करते. नवीन ग्रँड विटाराची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushak आणि VW Tigun यांच्याशी होईल.
महत्वाच्या बातम्या :