Nissan ने लॉन्च केली आपली नवीन SUV, आकर्षक लूकसह मिळणार हे फीचर्स
Nissan Magnite Red Edition Launch: ऑटो निर्माता कंपनी निसानने आपली नवीन SUV New Magnite Red Edition SUV भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लॉन्च केली आहे.
Nissan Magnite Red Edition Launch: ऑटो निर्माता कंपनी निसानने आपली नवीन SUV New Magnite Red Edition SUV भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लॉन्च केली आहे. कंपनीने ही एसयूव्ही 3 नवीन प्रकारांमध्ये जबरदस्त फीचर्ससह लॉन्च केली आहे. ही पॉवरफुल SUV लाल रंगात खूप आकर्षक दिसते. चला तर मग जाणून घेऊया याचे फीचर्स आणि किंमत.
Special Red Line
ग्राहकांना मॅग्नाइट रेड एडिशनच्या संपूर्ण बॉडी पॅनलवर लाल रंगाच्या रेषा पाहायला मिळणार. ज्या काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये अतिशय आकर्षक दिसतात.
फीचर्स
मॅग्नाइट रेड एडिशनच्या अपडेटेड फीचर्सबद्दल बोलायचे झाले, यात बोल्ड बॉडी ग्राफिक्स, टेल डोअर गार्निश आणि स्पेशल रेड कलर बॅज, नवीन फ्रंट ग्रिल, फ्रंट बंपर क्लेडिंग, व्हील आर्च आणि बॉडी साइड क्लेडिंग मिळते. तसेच यात एक एलईडी फॉग लॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प्स (डीआरएल) देखील दिसतात.
कलर ऑप्शन आणि व्हेरियंट
मॅग्नाइट रेड एडिशनच्या कलर ऑप्शन्स आणि व्हेरियंटबद्दल बोलायचे झाल्यास, या SUV ला तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले गेले आहे - मॅग्नाइट XV MT RED एडिशन, Magnite Turbo XV MT RED एडिशन आणि Magnite Turbo XV CVT RED एडिशन. कलर ऑप्शनमध्ये, मॅग्नाइट रेड एडिशनला दोन मोनोटोन कलर पर्याय दिसतील - Onyx Black आणि Storm White.
रेड टच केबिन
बाहेरच्या लुकप्रमाणेच कारच्या आतमध्येही लाल रंगाचा टच देण्यात आला आहे. यात लाल डॅशबोर्ड पाहायला मिळेल. याशिवाय 8.0 टचस्क्रीन, 7.0 पूर्ण TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील दिसेल. मॅग्नाइट रेड एडिशनला प्रीमियम रेड-थीम असलेला फ्रंट बोर्ड, डोअर साइड आर्मरेस्ट्स आणि सेंटर कन्सोलवर लाल अॅक्सेंट देखील मिळेल.
या नवीन कारमध्ये HRA0 1.0-लीटर टर्बो मोटर वापरली गेली आहे. जी 100PS कमाल पॉवर आणि 160Nm कमाल टॉर्क निर्माण करते. याशिवाय यात 1.0-लीटर एमटी, 1.0-लीटर टर्बो एमटी आणि 1.0-लीटर टर्बो सीव्हीटीचे तीन इंजिन पर्याय आहेत. ही कार 20 kmpl चा मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
किंमत
Magnite Red Edition भारतात 7.87 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. टर्बो CVT XV च्या टॉप व्हेरिएंटसाठी तुम्हाला 9.99 लाख रुपये मोजावे लागतील.