(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
Rohit Pawar on Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar on Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. मात्र, राज्यात नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडं मात्र, सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीतील विविध राजकीय पक्षांनी आपल्याच पक्षातील मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतं असतील तर मी स्वतः जाऊन त्यांना फुलांचा गुच्छ देईल. पुतण्या म्हणून त्यांचा आशिर्वाद देखील घेईल, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा
महायुतीत सर्वात जा्स्त जागा या भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळं भाजपच्या नेत्यांना वाटते की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेना शिंदे गटानं व्यक्त केली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं कोण मुख्यमंत्री होणार? हे पुढच्या एक दोन दिवसात समजणार आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
EVM च्या मुद्यावरुन देखील रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या EVM मध्ये अडकतेय का? असा सवाल रोहित पवारांनी केला. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणुक आयोगाने समोर आले पाहिजे असे पवार म्हणाले. महाराष्ट्र हे राज्य देशातील विकसित राज्य आहे.
बहुमत असताना देखील महाराष्ट्राचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागते असे रोहित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे केंद्रात जातील, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील
एकनाथ शिंदे केंद्रात जातील आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं दिसत असल्याचे रोहित पवार म्हणाले. मात्र, अजिचदादा मुख्यमंत्री होतं असतील तर मी स्वतः जाऊन फुलांचा गुच्छ देईल आणि पुतण्या म्हणून त्यांचा आशिर्वाद घेईल, असे रोहित पवार म्हणाले.
पेट्रोल किवा रॉकेल ओतून घेऊ नका, आई वडिलांचा चेहरा आठवा
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे जरमुख्यमंत्री झाले नाहीत तर मी स्वत:ला पेटवून घेऊन असं वक्तव्य अवधूत वाघ यांनी केलं होते. माध्याबरोबर 10000 कार्यकर्ते स्वत:ला पेटवून घेतील असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असं कोणी करू नये. केंद्रातील नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला तरी कोणी पेट्रोल किवा रॉकेल ओतून घेऊ नका. आपल्या आई वडिलांचा चेहरा आठवा असे रोहित पवार म्हणाले.
Evm मॅनेज झालं नसेल म्हणून भुजबळ 26 हजारांनी निवडून आले असतील
येवला मतदारसंघातून छगन भुजबळ निवडून आले आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो असे रोहित पवार म्हणाले. Evm मॅनेज झालं नसेल म्हणून ते 26 हजारांनी निवडून आले असतील असा टोला देखील रोहित पवारांनी छगन भुजबळांना लगावला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते खचून जाऊ नयेत म्हणून मी लढत आहे. निवडणूक आयोगाला ऐकावं लागेल आणि evm चं पोस्टमर्टम कराव लागेल. Evm च्या विरोधात सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे असंही रोहित पवार म्हणाले.