(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Mohammed Siraj On RCB : सिराज आता गुजरात टायटन्ससोबत आयपीएलमधील दुसरी इनिंग सुरू करणार आहे. गुजरात टायटन्स संघाने लिलावात 12.50 कोटी रुपये खर्च करून सिराजला विकत घेतले आहे.
Mohammed Siraj On RCB : इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी आयोजित मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू यापुढे त्यांच्या जुन्या संघासोबत खेळू शकणार नाहीत. असाच एक खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. मोहम्मद सिराज गेल्या मोसमापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला होता, पण फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही किंवा त्याला लिलावात विकत सुद्धा घेतले नाही. अशाप्रकारे सिराजचा आरसीबीसोबतचा सात वर्षांचा प्रवास थांबला आहे. एवढा वेळ टीमसोबत राहिल्यानंतर सिराजने जेव्हा संघापासून फारकत घेतली तेव्हा त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.
View this post on Instagram
सिराज आता गुजरात टायटन्ससोबत आयपीएलमधील दुसरी इनिंग सुरू करणार आहे. गुजरात टायटन्स संघाने लिलावात 12.50 कोटी रुपये खर्च करून सिराजला विकत घेतले आहे. सिराजने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी 93 सामन्यांत एकूण 93 बळी घेतले. सिराजने 2017 मध्ये आरसीबीसाठी पदार्पण केले.
इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना मोहम्मद सिराजने लिहिले की, 'प्रिय आरसीबी, आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. आरसीबीच्या जर्सीतील तो काळ आठवताच मला कधी कधी भावना, प्रेम आणि आदराची लाट जाणवते. ज्या दिवशी मी पहिल्यांदा RCB ची जर्सी घातली होती, तेव्हा मला वाटले नव्हते की आमच्यात असा बंध निर्माण होईल. मी RCB कलर्समध्ये टाकलेल्या पहिल्या चेंडूपासून ते घेतलेल्या प्रत्येक विकेटपर्यंत, खेळलेला प्रत्येक सामना, तुमच्यासोबत शेअर केलेला प्रत्येक क्षण हा प्रवास संस्मरणीय आहे. या काळात अनेक चढ-उतार आले, पण एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे तुमचे प्रेम आणि पाठिंबा. RCB माझ्यासाठी फक्त फ्रँचायझी नाही. ही एक भावना आहे, हृदयाचा ठोका आहे, घरासारखे वाटणारे कुटुंब आहे. या पोस्टसोबत सिराजने 'ना हमारा, ना तुम्हारा हुआ, इश्का का ये सितम ना गंवारा हुआ हे भावनिक गाणंही शेअर केले आहे. मोहम्मद सिराजच्या या पोस्टवर कमेंट करताना गुजरात टायटन्सच्या राशिदने फिरकी घेतली. रशीद खानने कमेंट करत 'आता तू आमचा झाला आहेस' असे लिहिले.
इतर महत्वाच्या बातम्या