BMW G 310 RR स्पोर्ट्स बाईक भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Bmw New Bike: प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी BMW Motorrad India ने बाजारात आपली नवीन BMW G 310 RR स्पोर्टबाईक लाँच केली आहे.
Bmw New Bike: प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी BMW Motorrad India ने बाजारात आपली नवीन BMW G 310 RR स्पोर्टबाईक लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक 2.85 लाख रुपयेच्या (एक्स-शोरूम) प्रारंभिक किमतीत लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. ज्यात BMW G 310 RR Standard आणि BMW G 310 RR स्टाइल स्पोर्टचा समावेश आहे.
किंमत आणि इंजिन
कंपनीने BMW G 310 RR स्टँडर्ड व्हेरिएंट 2.85 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे. तर BMW G 310 RR स्टाइल स्पोर्ट व्हेरिएंटची किंमत 2.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याची बुकिंग भारतात आधीच सुरू करण्यात आली होती. ग्राहक कंपनीच्या डीलरशिपला भेट देऊन ही बाईक बुक करू शकतात. या नवीन बाईकमध्ये कंपनीचा सिग्नेचर व्हाईट पेंट देण्यात आला आहे. ज्याला निळे आणि लाल 'M' शैलीचे ग्राफिक्स देखील मिळतात. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये TVS Apache RR 310 मध्ये वापरलेले 313cc, सिंगल सिलेंडर, इंधन इंजेक्टर इंजिन वापरले आहे. जे 33.5 bhp पॉवर आणि 27.3 न्यूटन मीटर टॉर्क देते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याशिवाय नवीन BMW G310 RR मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, राईड-बाय-वायर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि चार राइडिंग मोड - अर्बन, ट्रॅक, स्पोर्ट आणि रेन सारखे फीचर्स देखील मिळणार.
2022 BMW G 310 R बाईकमध्ये 17-इंच अलॉय व्हील मिळतात. जे समोर USD आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशनसह येतात. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांमध्ये एकच डिस्क वापरण्यात आली आहे. यात ड्युअल चॅनल एबीएस मिळते. इतर महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही बाईक फुल-एलईडी लाइटिंग सिस्टम, अॅडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हर्स आणि संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते.
महत्वाच्या बातम्या :