2024 Renault Duster: New Generation Renault Duster चे फिचर्स लीक, कशी असेल नवी Renault Duster?
थर्ड जनरेशनच्या रेनो डस्टर एसयूव्हीचा वर्ल्ड प्रीमिअर नुकताच पोर्तुगालमध्ये पार पडला. नवीन मॉडेल पुढील वर्षाच्या सुरुवातीला युरोपियन बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते भारतात लाँच होणार आहे.
New Generation Renault Duster : थर्ड जनरेशनच्या रेनो डस्टर एसयूव्हीचा वर्ल्ड प्रीमिअर नुकताच पोर्तुगालमध्ये पार पडला. नवीन मॉडेल पुढील वर्षाच्या सुरुवातीला युरोपियन बाजारात येण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते भारतासह इतर देशांमध्ये लाँच केले जाईल. मात्र, भारतात याची लाँचिंगची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र 2025 च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर ही एसयूव्ही ह्युंडाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा हायडर, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन तायगुनला टक्कर देण्याची शक्यता आहे.
डिझाइन आणि फिचर्स....
जनरेशन अपडेटनंतर डस्टर एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स, बेस आणि पॉवरट्रेनमध्ये मोठा बदल होणार आहे. इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर यात लाइट आणि डार्क ब्राऊन कलर स्कीम्सचे रिफाइंड मिक्स सह ड्युअल टोन डॅशबोर्ड लेआउट मिळेल. हायर ट्रिममध्ये ड्युअल डिजिटल स्क्रीन सेटअप मिळू शकतो, ज्यात ड्रायव्हर इंस्ट्रूमेंट क्लस्टरसाठी 7 इंचाचा डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी 10.1 इंचाचा टचस्क्रीनचा समावेश आहे.
या एसयूव्हीचे इंटिरिअर डिझाइन ड्रायव्हर सेंट्रिक असेल ज्यात एचव्हीएसी सिस्टमसह मल्टिपल बटन सेंट्रल एसी व्हेंटच्या खाली एक होराइजेंटल पैनलसह असेल. 2024 रेनो डस्टरमध्ये इंटिग्रेटेड कंट्रोलसह 3-स्पोक स्टीअरिंग व्हील, 12V पॉवर सॉकेट आणि यूएसबी पोर्टसारखे फीचर्स मिळतील. टॉप ट्रिम्समध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सारखे अॅडव्हान्स फीचर्स समाविष्ट केले जाऊ शकतात. नव्या डस्टरमध्ये लेन चेंज अलर्ट, हाय स्पीड अलर्टसह ट्रॅफिक साइन रिकग्निशन, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, व्हेइकल रिकग्निशन, लेन चेंज असिस्ट, रिअर पार्किंग असिस्ट अशा अनेक सेफ्टी फीचर्ससह उपलब्ध असणार आहे.
मोठा बूट स्पेस मिळेल...
नवीन सीएमएफ-बी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली 2024 रेनो डस्टर 472 लिटर क्षमतेची मोठी बूट स्पेससह येईल. डॅसिया बिगस्टर सारखी ही एसयूव्ही 4.34 मीटर लांबीची आहे, जी सध्याच्या मॉडेलपेक्षा लांब आणि स्पोर्टी दिसते आणि लूकदेखील आकर्षक आहे.
मागील मॉडेलपेक्षा अॅडव्हान्स फिचर्स
ऑफ-रोडच्या बाबतीत, नवीन डस्टर त्याच्या मागील मॉडेलपेक्षा अॅडव्हान्स असेल. जागतिक बाजारपेठेत ही एसयूव्ही तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. ज्यात 1.2 किलोवॉट बॅटरी पॅकसह 1.6 एल, 4-सिलिंडर पेट्रोल हायब्रिड (ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप) आणि निवडक बाजारपेठांसाठी 130 बीएचपी, 1.2 एल, 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल आणि 48 व्ही स्टार्टर मोटर सह 1.0-लीटर पेट्रोल-एलपीजी इंजिनचा समावेश आहे. 1.2 एल माइल्ड हायब्रीड इंजिन 4X2 आणि 4X4 ड्राइव्हट्रेन सिस्टमसह उपलब्ध असेल.
इतर महत्वाची बातमी-