(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Honda Car Discount Offers : होंडाच्या 'या' कारवर मिळतेय 27 हजारांपर्यंत दमदार ऑफर, लवकर बुक करा तुमची आवडती कार
Honda Car Discount Offers : Honda Amaze 1.2-लीटर चार-सिलेंडर पेट्रोलसह सुसज्ज आहे, जे 90hp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
Honda Car Discount Offers : वर्षातला शेवटचा महिना अर्थात डिसेंबरचा (December) महिना हा अनेक अर्थांनी खास असतो. या महिन्यात सण-उत्सवांबरोबरच ऑटो क्षेत्रातही (Auto News) मोठे बदल पाहायला मिळतात. या महिन्यात, ग्राहकांसाठी अनेक ऑटो क्षेत्रात अनेक मोठ्या कारवर बंपर ऑफर देण्यात आली आहे. होंडा आपल्या दोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारवर बंपर ऑफर देत आहे. होंडा सिटी आणि होंडा अमेझ असं या कारचं नाव असून यावर बंपर सूट देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाला तुम्ही देखील कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर उत्कृष्ट कार मॉडेल्सच्या या ऑफर्स अजिबात चुकवू नका. या कारवर नेमकी किती ऑफर मिळतेय या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
होंडा सिटी (Honda City)
कंपनीची सर्वाधिक मागणी असलेल्या सेडान होंडा सिटीच्या (Sedan Honda City) पेट्रोल व्हेरियंटवर 1 लाख रुपयांपर्यंत कमाल सूट देत आहे. ज्यामध्ये 27 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. एक्सचेंज बोनस म्हणून 15,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच, 25 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 15 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. याशिवाय, कंपनी जुन्या ग्राहकांना फायदे देखील देत आहे. यामध्ये ग्राहकांना 27 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, 1.5-लिटर चार-सिलेंडर इंजिन 121hp/145Nm आउटपुट जनरेट करण्यास सक्षम आहे. होंडा सिटीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड CVT ट्रान्समिशनचा पर्याय आहे. या सेडानची एक्स-शोरूम किंमत 11.63 लाख रुपयांपासून सुरू होते, जी मजबूत-हायब्रिड व्हेरिएंटसाठी 18.89 लाख रुपयांपर्यंत जाते.
होंडा अमेझ (Honda Amaze)
कंपनी Honda Amaze वर उत्तम ऑफर देखील देत आहे. Amaze वर 25 हजार रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. यावर कॉर्पोरेट डिस्काउंट आणि लॉयल्टी बोनस म्हणून 27 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. आणि 15,000 रुपये एक्सचेंज बोनस म्हणून दिले जात आहेत. Honda Amaze 1.2-लीटर चार-सिलेंडर पेट्रोलसह सुसज्ज आहे, जे 90hp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 7.10 लाख रुपयांपासून सुरू होते. ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :