एक्स्प्लोर
यंदा फटाके विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट
दोन वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या मैदानावर लावलेल्या फटाका स्टॉलला आग लागली होती. त्यात फटाका विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्यावर्षी फटाका विक्रेत्यांची संख्या कमी झाली होती.

औरंगाबाद : राज्यात गंभीर दुष्काळाचे परिणाम आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळेची मर्यादा घातल्याने फटाका विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी औरंगाबादमध्ये फक्त 50 टक्केच फटाका विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे.
औरंगाबाद शहरात एकूण पाच फटाका मार्केट होते. या पाच फटाका मार्केटमध्ये या वर्षी आठ कोटी रुपयांचे फटाके खरेदी करण्यात आले आहे. मात्र यावर्षी त्यातील 50 टक्के फटाकेच विक्रीला गेले आहेत. आजही मार्केटमध्ये 50% फटाका शिल्लक असल्याने विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला आहे.
दोन वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या मैदानावर लावलेल्या फटाका स्टॉलला आग लागली होती. त्यात फटाका विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्यावर्षी फटाका विक्रेत्यांची संख्या कमी झाली होती.
यावर्षी चार महिन्यांपूर्वी विक्रेत्यांनी फटाका मार्केट मध्ये पैसे गुंतवले होते. मात्र यंदाचा गंभीर दुष्काळ फटाका मार्केटला फटका देऊन गेला. त्यातच कोर्टाने केवळ दोन तास फटाका वाजवण्याची मुभा दिली होती. त्यामुळेही फटाक्यांची विक्री कमी झाली आहे.
आता फटाका विक्रेत्यांना हे फटाके वर्षभर सांभाळावे लागणार आहे. शिवाय गुंतवलेले पैसे देखील मिळालेले नाहीत. त्यामुळे मेहनत तर वाया गेली, सोबतच हातात नफ्यापोटी एक दमडीही शिल्लक राहिली नसल्याने विक्रेत्यांना नुकसान भोगावे लागले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
