एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी एल्गार, 19 मार्चला राज्यव्यापी उपोषण

मुंबई : शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी राज्यव्यापी उपोषणाची हाक दिली आहे. 19 मार्च रोजी ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी आपापल्या ठिकाणाहून या उपोषणात सहभागी होण्याचं आवाहनही अमर हबीब यांनी केलं आहे. अमर हबीब यांनी काय आवाहन केलं? “19 मार्च रोजी होणारे उपोषण हे कोणा पक्षाचे नाही. कोणा संघटनेचे नाही. शेतकऱ्याविषयी संवेदना असणाऱ्या प्रत्येकाचे आहे. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बसायचे असेल तर जरूर बसा. बसायचे नसेल तर बसू नका. पण त्या दिवशी उपोषण मात्र करा.”, असं जाहीर आवाहन अमर हबीब यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती : अमर हबीब “शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीच्या वेळेस आपण आपले किरकोळ मतभेद बाजूला ठेवूया. सारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या बाजूने उभा ठाकला तरच मरणाच्या दारावर उभा राहिलेला शेतकरी मागे फिरेल आणि सरकारलाही शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे भाग पडेल.”, असेही अमर हबीब यांनी सांगितले. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब अमर हबीब यवतमाळमध्ये उपोषणाला बसणार किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी उपोषणाची हाक दिली असून, ते स्वत:ही या उपोषणात सक्रिय सहभाग घेणार आहेत. अमर हबीब हे यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये उपोषणाला बसणार आहेत. ज्यांना महागावला जाणं शक्य आहे, त्यांनी तिथेही सहभागी होऊन पाठिंबा दर्शवण्याचं आवाहन अमर हबीब यांनी केलं आहे. दिग्गजांचा उपोषणाला पाठिंबा साहित्य आकादमी पुरस्कार विजेते लेखक आसाराम लोमटे हे या उपोषणात सक्रीय सहभागी होणार आहेत. शेती, शेतकरी, गरिबी यांबाबत भिडणारं लेखन करणाऱ्या लेखकाचा शेतकऱ्यांसाठीच्या उपोषणाला पाठिंबा मिळाल्याने आनंद वाटल्याच्या भावना अमर हबीब यांनी एबीपी माझा वेब टीमशी बोलताना बोलून दाखवल्या. शिवाय, मराठीतील प्रसिद्ध कवी-गीतकार गुरु ठाकूर यांनीही या उपोषणाला पाठिंबा दिला असून, तेही सहभागी होणार आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांसह गाव-खेड्यांमधूनही शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं-मुली या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली. शरद जोशींचे सहकारी म्हात्रे सरांचाही सहभाग शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे हेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शरद जोशी परदेशातून आल्यानंतर पुण्यातील आंबेठाण येथे शेती करू लागले. पुढे हेच आंबेठाण शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनले. सुरेशचंद्र म्हात्रे हे याच ठिकाणाहून उपोषणात सहभागी होणार आहेत. बाहेर जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याने सुरेशचंद्र म्हात्रे घरी राहूनच उपोषण करणार आहेत. उपोषणाची तारीख 19 मार्च का? साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनीही वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाईटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही.  म्हणून अस्वस्थ होते. एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्त्या रोज होतील असा इशारा दिला होता. ही पहिली जाहीर झालेली शेतकऱ्याची आत्महत्या. ती साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी केली होती. या 19 मार्चला त्यास 31 वर्ष होतात. म्हणून उपवासासाठी 19 मार्च ही तारीख निवडण्यात आली असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली. उपोषणाबाबत अमर हबीब यांची भूमिका
गेल्या 31 वर्षापासून अखंडपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होत आहेत. हा उन्हाळा संपता संपत नाही. शेतकार्यांच्या आत्महत्या ही ‘राष्ट्रीय आपत्ती’ समजून उपाययोजना करायला पाहिजे होती. ना त्या सरकारने केली, ना हे सरकार करीत आहे. सरकार दखल घेत नाही तेंव्हा नागरिक म्हणून आपली जबाबदारी वाढते. आपण काय करू शकतो?, अशी दुर्दैवी घटना आपल्या घरात घडली तर आपण अन्नाचा घास घेऊ शकू का? ‘नाही’ हेच उत्तर असेल तर उपवास करण्याचे पहिले तेच आहे. शेतकऱ्याविषयी सहवेदना जिवंत असल्याची ही साक्ष आहे. आपल्या उपोषणाने काय घडेल, हे मी आज काही सांगू शकत नाही पण एवढे मात्र नक्की की, शेतकरी मारत होते तेंव्हा मी तटस्थपणे पहात राहिलो नाही, मला त्याशी जोडून घेण्यासाठी उपवास केला असे सांगताना सार्थकता वाटेल. मला वाटते, बिंदू-बिदूतून सरिता बनते व तीच पुढे सागराला जाऊन मिळते. कदाचित आपला उपवास ही त्या प्रवासाची सुरुवात ठरेल. ‘एखादी’ व्यक्ती जेंव्हा आत्महत्त्या करते तेंव्हा त्याचे मानसिक कारण असू शकते. पण एकाच व्यावसायातील लाख लाख लोक जेंव्हा आत्महत्त्या करतात, तेंव्हा त्याचे मूळ कारण मानसिकतेत नसते, तर ते सामाजिक व आर्थिक परिस्थितीत शोधले पाहिजे. शेती व्यावसाय तोट्यात ठेवण्यात आला. दारिद्र्य वाढत गेले. पर्यायांचां आभाव राहिला. या सर्व गोष्टींचा विचार केला तर या देशातील शासनकर्त्यांनी जाणीवपूर्वक शेतकरीविरोधी धोरणे राबविली असा निष्कर्ष निघतो. ही धोरणे राबविण्यासाठी त्यांनी काही कायदे निर्माण केले. शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग), आवाश्यक वस्तूंचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदे हे कायदे अस्त्र म्हणून वापरले. वरील कायदे कायम ठेवून शेतकऱ्यांचे भले करता येत नाही. म्हणून ज्याला शेतक-यांचे भले करायचे आहे त्याने या कायद्यांच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. 19 मार्च रोजी होणारे उपोषण शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणारे आहे म्हणजेच ते शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करणारे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget