Shirdi News : साईभक्तांनी मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सचं पालन करा, शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे आवाहन
Shirdi News : शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्क वापरावे तसेच कोविडच्या बूस्टर डोसचं लसीकरण सुद्धा करुन घ्यावं असं, आवाहन साईबाबा संस्थानने केलं आहे.
Shirdi News : विदेशातील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान (Sai Baba Sansthan Trust) सुद्धा सतर्क झालं आहे. शिर्डीमध्ये (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्क (Mask) वापरावे तसेच कोविडच्या बूस्टर डोसचं (Covid 19 Booster Dose) लसीकरण सुद्धा करुन घ्यावं असं, आवाहन साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केलं आहे.
पर्यटन स्थळासोबतच धार्मिक स्थळी देखील नाताळची सुट्टीत गर्दी होईल. त्यातच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा भारतातील शिरकाव ही बाब लक्षात घेऊन मंदिर प्रशासन अलर्ट झालं असून भाविकांना काळजी घेण्यास सांगितलं जात आहे. ठशिर्डीत येणाऱ्या भाविकांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, सॅनिटायझरचा वापर करावा जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग होणार नाही. त्यासोबतच ज्यांनी कोविडचा बूस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी तो घ्यावा," असं राहुल जाधव यांनी म्हटलं आहे.
नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतााठी लाखो भाविक शिर्डीत येण्याची शक्यता
शिर्डीला दररोज हजारो तर सुट्टीच्या काळात लाखो भाविक हजेरी लावत असतात. येणारी नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने मास्क लावण्याचं आणि बुस्टर डोस घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
यापूर्वी जवळपास 14 महिने साई मंदिर भाविकांसाठी बंद
यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत आठ महिने तर दुसरा लाटेत सहा महिने साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणूनच साईबाबा संस्थांन सुद्धा सतर्क झालं आहे.
कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती
दुसरीकडे कोल्हापूरमध्ये आजपासून (23 डिसेंबर) अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. .पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबतचा निर्णय घेतला असून 175 कर्मचारी उद्यापासून मास्क वापरणार आहेत.. कोरोनाव्हायरच्या नव्या व्हेरियंटचा भारतात शिरकाव झाल्याची समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. तर मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं आहे.
दर्शनासाठी येताना मास्क वापरा, दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानचं आवाहन
तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानने गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन केलं आहे. गणेशभक्तासांठी तातडीने पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
संबंधित बातमी