Shirdi Bus Vandalized : पीएम मोदींची शिर्डीत जनसभा, नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसची तोडफोड, मराठा आरक्षण मुद्द्यावरुन नागरिक संतप्त
PM Narendra Modi In Shirdi : पीएम मोदींच्या शिर्डीतील सभेसाठी नागरिकांना घेऊन जात असलेल्या बसेसची तोडफोड केल्याचे समोर आले आहे.
![Shirdi Bus Vandalized : पीएम मोदींची शिर्डीत जनसभा, नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसची तोडफोड, मराठा आरक्षण मुद्द्यावरुन नागरिक संतप्त Ahmednagar Latest News PM Modi public meeting in Shirdi vandalism of buses on maratha reservation issue maharashtra news Shirdi Bus Vandalized : पीएम मोदींची शिर्डीत जनसभा, नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसेसची तोडफोड, मराठा आरक्षण मुद्द्यावरुन नागरिक संतप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/26/ffc3db122b837ad9780fd92aa14595511698309769618738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काकड या गावी जनसभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मोदींच्या याच कार्यक्रमासाठी जात असलेल्या काही एसटी बसेसच्या काचा फोडल्या गेल्या. नगर जिल्ह्यातील मंगरूळ येथील घटना असून मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभरात तापलेला असताना मोदींच्या सभेला जाणाऱ्या गाड्यांना, बसेसवर सुद्धा याचा फटका बसला. त्यामुळे बसेसचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून शिर्डी साई दर्शनासह अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. तसेच शिर्डी विमानतळाजवळील काकड या गावी सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून नागरिकांना सभास्थळी आणले जात आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली असून याच बसेस नागरिकांना आणण्यासाठी गेल्या असता त्या बसेसच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मंगरूळ येथील घटना असून शिर्डीला जाणाऱ्या बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभरात तापलेला असताना मोदींच्या सभेला जाणाऱ्या गाड्यांना, बसेसवर सुद्धा याचा फटका बसला आहे.
सभेला जिल्हाभरातून नागरिकांना कार्यक्रम स्थळावर आणण्यासाठी 1000 गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या गाड्या ज्यावेळेला गावोगावी जात आहेत, त्या ठिकाणी मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात शेवगाव तालुक्यातील मठाची वाडी आणि भातपूर या ठिकाणी गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, संबंधित गावातील नागरिकांनी या गाड्या माघारी पाठवण्यात आहेत. त्यांनतर आता याच परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला असून मंगळूर येथील नागरिकांनी सभास्थळी नेण्यासाठी जात असलेल्या बसेसची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. 'जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा आंदोलन सुरू राहील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या कार्यक्रमाच्या दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भामध्ये भूमिका जाहीर करावी, असे मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येते आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरु असल्याचे दिसून येत आहे.
कार्यक्रमासाठी आलेल्या गाड्या परत पाठवल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शिर्डी (Shirdi Visit) दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत. गावबंदी असल्यानं शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील मराठा समाजाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आवाहानानंतर मंत्री विखे यांच्या कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या बसेस अडवण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गावागावत नेत्यांना गावबंदी केली जात आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची गाडी देखील अडवण्यात येऊन त्यांना जाब विचारण्यात आला आहे.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या सभेला जाणाऱ्या बसेस अडवून परत पाठवल्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)