एक्स्प्लोर

PM Modi Shirdi Visit LIVE : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi Shirdi Today LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मोदींनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं, यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

LIVE

Key Events
PM Modi Shirdi Visit LIVE : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Background

PM Narendra Modi at Shirdi visit today LIVE Updates: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Shirdi visit) आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात नरेंद्र मोदी साईबाबांच्या समाधीच दर्शन घेऊन करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.  2018 मध्ये साईबाबांच्या समाधीचं शताब्दी वर्ष होतं. या सोहळ्याची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातावरणकुलीत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.

कसा असेल मोदींचा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा?

  • पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणार 
  • त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करतील 
  • पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार
  • यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल
  • पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील
  • सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश 
  • या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील
16:44 PM (IST)  •  26 Oct 2023

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री राहिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले.आम्ही त्याच कालावधीत साडे 13 लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केल असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. 

16:35 PM (IST)  •  26 Oct 2023

PM Modi Visit Shirdi : हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

PM Modi Visit Shirdi : ज्येष्ठ किर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. देशातील अनमोल रत्न वारकरी संप्रदायाचे बाबा महाराज सातारकर यांच्या वैकुंठगमनाचे दुखद बातमी समजली. त्यांचे आदरपूर्वक बोलणे, वाणीची शैलीची त्याचा प्रभाव आम्ही पाहिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

15:33 PM (IST)  •  26 Oct 2023

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीजवळील काकडी गावात सभास्थळी दाखल, हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित 

PM Modi Visit Shirdi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच त्यांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणात जलपूजन केले. तसेच डाव्या कालव्याचे उदघाटन देखील करण्यात आले. यानंतर पीएम मोदी आता शिर्डी विमानतळाजवळील काकडी या गावी आले असून या ठिकाणी सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत विविध कामाचे उदघाटन देखिल करण्यात येणार आहे. 

14:23 PM (IST)  •  26 Oct 2023

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून  स्वागत

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान मोदींनी शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेत पाद्यपूजन आणि आरती केली. त्यानंतर आता मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या उद्घाटनासाठी पोहचले आहेत. याठिकाणी सुरवातीला मोदी यांनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टर द्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget