Mahadeo Jankar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर आरक्षणासाठी समाजाच्या रेट्याची गरज; महादेव जानकरांची स्पष्टोक्ती
Ahmednagar News : आजपासून राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा सुरु झाली असून यात्रेची सुरवात शिर्डी मतदारसंघातून करण्यात आली आहे.
अहमदनगर : मराठा समाजाला (Maratha Aarkshan) ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि धनगर समाजालाही (Dhangar Aarkshan) आरक्षण हवं असेल तर समाजाचा रेटा तयार व्हायला हवा, त्यासाठी तेवढे आमदार-खासदार असणं गरजेचं असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. आजपासून राष्ट्रीय पक्षाची जन स्वराज यात्रा सुरु झाली असून यात्रेची सुरवात शिर्डी मतदारसंघातून करण्यात आली आहे. यावेळी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी कोल्हार मातेचं दर्शन घे यात्रेला सुरवात केली.
सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) राजकीय पक्षाकडून 2024 च्या निवडणुकांची (Elections 2024) मोर्चेबांधणी सुरु झाली असून सभा, भेटी गाठी, मेळावे आदी कार्यक्रमांना जोर चढला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडूनही जनस्वराज यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावागावात जाऊन पक्ष संघटन करण्यावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात जन स्वराज यात्रेला सुरवात झाली असून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते जानकर यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Loksabha) ही यात्रा दौरा करणार आहे.
दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Party) महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जन स्वराज यात्रा (Jan swaraj yatra) शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित मंदिर असलेल्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती देवीच्या दर्शन घेतले. येथून दर्शन घेऊन जन स्वराज यात्रेला सुरूवात झाली असून पक्ष वाढीसाठी व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी यात्रा काढण्यात आल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जन स्वराज यात्रा आजपासून शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. दोन दिवस ही यात्रा मतदारसंघातील विविध गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे.
पंकजा मुंडे माझी बहिण, माहेरच्या झोपडीत आणणार
यावेळी यात्रेला सुरवात होण्यापूर्वी महादेव जानकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि धनगर समाजालाही आरक्षण हवं असेल तर समाजाचा रेटा तयार व्हायला हवा, त्यासाठी तेवढे आमदार-खासदार असणं गरजेच असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच पंकजा मुंडे माझी बहिण असून आज ती एका जबाबदार पक्षाचं काम करते आहे. ज्यावेळी बहिणीला खुप त्रास होईल, तेव्हा तिला माहेरच्या झोपडीत मी घेऊन येईल, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी :
Mahadev Jankar: माझ्या बहिणीला रासपात घेऊन मुख्यमंत्री केल्यास तुमची काय अवस्था होईल - महादेव जानकर