(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amber Heard-Johnny Depp : मानहानीच्या खटल्यातून एम्बर हर्डची माघार; पोस्ट शेअर करत दिली माहिती
Amber Heard-Johnny Depp : एम्बर हर्डने मानहानीचं प्रकरण मिटवलं आहे.
Amber Heard-Johnny Depp : अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) आणि हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) गेल्या काही दिवसांपासून मानहानीच्या खटल्यामुळे चर्चेत आहेत. न्यायाधीशांनी एम्बरला मानहानी खटल्यात दोषी ठरवले होते. अखेर हे मानहानी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न एम्बरने केला आहे.
एम्बरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"खूप विचार केल्यानंतर मी मानहानीच्या खटल्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मला सोशल मीडियावरवर अनेकदा अपमानाचा सामना करावा लागला आहे. अखेर आता मला सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका गोष्टीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे. दिलेल्या अटी मला मान्य आहेत".
View this post on Instagram
एम्बरने पुढे लिहिलं आहे,"अमेरिकन कायदेशीर व्यवस्थेवरुन माझा विश्वास उडाल्याने मी हा निर्णय घेतला आहे. मी कौटुंबिक आणि लैंगिक हिंसाचाराला बळी पडले होते. पण पुरावे नसल्याने निकाल माझ्या बाजूने लागला नाही. आता अशा प्रकारचा अपमान मी सहन करू शकत नाही. मानहानी खटल्यादरम्यान मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. धन्यवाद...लवकरच भेटू...".
नेमकं प्रकरण काय?
जॉनी डेप आणि एम्बर हर्डचा मानहानीचा दाखला गेल्या काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला होता. या खटल्यात न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजून निर्णय दिला होता. त्यामुळे एम्बर हर्ड दोषी ठरली होती. यात जॉनीने आपली बदनामी झाल्याचे सिद्ध केले. तर दुसरीकडे न्यायालयाने एम्बरला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि पाच दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान असे एकूण 15 दशलक्ष डॉलर भरण्याचे आदेश दिले होते.
एम्बर हर्डने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत काम केलं आहे. तर जॉनी डेप हा हॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि संगीतकार आहे. त्याला तीन अकादमी पुरस्कांव्यतिरिक्त गोल्डन ग्लोब अवॉर्ड, स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या