एक्स्प्लोर
Advertisement
सीबीएसई परीक्षेला 75 टक्के हजेरी बंधनकारक, अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही
या यादीवर 7 जानेवारी रोजी अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची हजेरी 75 टक्के पेक्षा कमी आहे आणि त्यामागे खरंच काही कारण असेल तर अशा विद्यार्थ्यांना गैरहजर राहिल्याचे विद्यार्थ्याला पुरावे सादर करण्यास सांगितले जाईल
मुंबई : दहावी आणि बारावी परीक्षा दीड महिन्यावर असताना अचानक केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने(CBSE)नोटीस जारी केली आहे. या नोटिशीनुसार , यावर्षी 1 जानेवारी 2020 मधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शाळांनी द्यायची आहे. ज्यामध्ये सीबीएसई शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची परवानगी देऊ नये असा आदेश शाळांना देण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यांनाच हॉल तिकीट देण्यात येणार आहे. लवकरच हॉल तिकीट वाटप केले जाणार असून ज्या विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांचे परिक्षेचे हॉल तिकीट मिळणार नाहीत
ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी असेल अशा विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. या यादीवर 7 जानेवारी रोजी अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची हजेरी 75 टक्के पेक्षा कमी आहे आणि त्यामागे खरंच काही कारण असेल तर अशा विद्यार्थ्यांना गैरहजर राहिल्याचे विद्यार्थ्याला पुरावे सादर करण्यास सांगितले जाईल
7 जानेवारीच्या आत विद्यार्थ्यांकडून विभागीय कार्यलयामध्ये खुलासा आला नाही तर त्यांना सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस बसता येणार नाही.
सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 26 फेब्रुवारी 2020 पासून सुरु होऊन 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. तर बारावीची परीक्षा 22 फेब्रुवारीपासून 30 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.
... तर पुरावे जमा करा
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजारी असल्याकारणाने मोठी सुट्टी घेतली असल्यास मेडिकल सर्टिफिकेट, कोणी नातेवाईक, जवळचे वारले असल्यामुळे मोठी सुट्टी घेतली असल्यास संबंधित व्यक्तिचे डेथ सर्टिफिकेट दाखवावे लागणार आहे. क्रीडा प्रकारात भाग घेतल्यामुळे मोठी सुट्टी घेतली असल्यास तसे पत्र सीबीएसेच्या विभागीय कार्यालायत जाऊन 7 जानेवारीपर्यंत जमा करायचे आहे. विभागीय कार्यालयातील डेटाची सीबीएसई छाननी करून या महिन्याच्या अखेरीस सीबीएसई 10 आणि 12 बोर्डाचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देणार आहे. त्यामुळे सीबीएसई शाळेतील ज्या विद्यार्थ्याची उपस्थिती 75 टक्के पेक्षा कमी आहे त्यांनी तात्काळ हे पुरावे जमा करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना या यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेला मुकावे लागेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement