Weight Loss: 'या' सवयींमुळे पोटाची चरबी वाढते, ही आहेत मुख्य कारणे
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला या सवयी बदलाव्या लागतील.
![Weight Loss: 'या' सवयींमुळे पोटाची चरबी वाढते, ही आहेत मुख्य कारणे weight loss tips what causes to increase belly fat stomach fat Weight Loss: 'या' सवयींमुळे पोटाची चरबी वाढते, ही आहेत मुख्य कारणे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/5340baa05a9dcaf07171fcb502cdbdc6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Belly Fat : पोटाची चरबी वाढण्याची समस्या अनेकांना जाणवत असते. शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने पोटाची चरबी वाढते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. तुमच्या काही सवयींमुळे पोटावर चरबी झपाट्याने वाढते. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला आधी या सवयी बदलाव्या लागतील. जाणून घेऊयात पोटाची चरबी वाढण्याचे कारणं
1. घाईघाईत जेवण करणे: आजकाल धकाधकीच्या जीवनात अनेकांना जेवण्यासाठी देखण्यासाठी वेळ नसतो. घाईघाईत फास्ट फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. घाईघाईत जेवण केल्यानं पोटावरील चरबी वाढते.
2. जेवणाची वेळ: जेवण वेळेत न केल्यानं पोटाची चरबी रात्रीचे जेवण 7 वाजेपर्यंत करा. रात्रीचे जेवण आणि झोपेत तीन तासांचे अंतर असावे. जर तुम्हाला रात्री उशिरा जेवण करण्याची सवय असेल तर तुमच्या पोटाची चरबी वाढेल.
3. जेवणाचे प्रमाण : जेवण हे योग्य प्रमाणात करावे. कारण जास्त प्रमाणात जेवण केले तर कॅलरी वाढतात. त्यामुळे पोटाची चरबी वाढते.
4. जास्त वेळ झोपणे: जास्त वेळ झोपण्याच्या सवयीमुळे अन्नाचे पचन होत नाही. त्यामुळे पोटाची चबरी वाढते.
पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला तळलेले आणि मसाल्याचे पदार्थ खाणे कमी करावे लागेल. तसेच डाएटमध्ये तुम्हाला फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा लागेल.
वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की सकाळी 2 कप कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने बेली फॅट्स कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)