Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? 'या' सोप्या पद्धतींचा वापर करा
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी, आहार आणि व्यायामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःशी कठोर राहावे लागेल.
Weight Loss Tips : बहुतेकांना वाढलेले वजन, बाहेर आलेले बॅली फॅट, वाढणारी चरबी आवडत नाही. इतरांप्रमाणे आपणही शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असावे, निरोगी असावे असे प्रत्येकाला वाटते. अशा वेळी आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही काही दिवसांतच वजन नियंत्रित करू शकता. वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घ्या.
वजन कसे कमी करावे?
- वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या आहारावर नियंत्रित ठेवणे. यासाठी तुम्हाला चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळलं पाहिजे तसेच तुम्ही कमीही खाल्लं नाही पाहिजे.
- तुम्हाला 8 तासांची झोप घ्यावी लागेल. कारण यापेक्षा कमी झोपल्याने तुमचे शरीर अधिक फुगू लागते. तसेच जास्त चरबी दिसून येते.
- गोड खायची इच्छा असल्यास मिठाईच्या ऐवजी फळे खा. यामुळे तुमची गोढ खायची इच्छा शमेल.
जास्त खाण्याची इच्छा कशी थांबवावी?
जर तुम्हाला जास्त खाण्याची सवय असेल किंवा इच्छा असूनही तुम्ही खाण्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल. फास्ट फूड, मिठाई किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ यापासून तुम्ही स्वत:ला थांबवू शकत नसाल तर ही सुवय तुम्हाला लावून घ्यायला हवी. यापासून होणारे दुष्परिणाम तुम्हाला माहीत असायला हवे. ही सवय तुमचे वजन नियंत्रित करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
वजन कमी करण्याची सोपी युक्ती :
काहीही खाण्यापूर्वी ताट समोर ठेवा आणि स्वतःला विचारा की ताटात ठेवलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या शरीराला किती पोषण मिळेल, किती फॅट आणि किती कॅलरीज मिळतील? तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच, तुमचे शरीर आपोआप हार्मोन्स सोडेल जे लालसा शांत करतात आणि तुम्ही अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज घेणे टाळाल. म्हणजेच तुमच्या शरीरात जास्त चरबी जाणार नाही आणि शरीराला आवश्यक तेवढेच तुम्ही खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :