Propose Day 2021: आज प्रपोज डे...अशा पद्धतीने व्यक्त करु शकता आपल्या प्रेमाच्या भावना
Valentine Week 2021: व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली असून आज तरुणाईकडून प्रपोज डे (Propose Day) साजरा केला जातोय. आजच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी अनेकजण आतुरलेले असतात.
Propose Day 2021: फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमी युगुलांसाठी गुलाबी महिना. या महिन्यात जगभरातील वयाने आणि मनाने तरुण असलेले लोक व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. रोज डे पासून या वीकला सुरुवात झाली असून आज त्याचा पुढचा अंक प्रपोज डे साजरा करण्यात येतोय. या दिवसाची अनेक तरुण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.
आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही असं म्हटलं जातंय. मग हे प्रपोज कशा पद्धतीनं करायचं हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्यासाठी काही पद्धती अथवा मार्ग आहेत. त्यातील काही गोष्टींचा वापर करुन आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.
सुंदर असं गिफ्ट देणं सुंदर फुल आणि सुंदर गिफ्ट प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे आपणही आपल्या आवडत्या व्यक्तीला एक गिफ्ट आणि त्या सोबत गुलाबाचे फुल देऊन प्रपोज करु शकता. काही शायरी किंवा कविताच्या माध्यमातून प्रपोज केलंत तर मग यशाची शक्यता जास्त आहे.
Rose Day 2021: 'रोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल?
सुंदर ठिकाणी प्रपोज करा जर आपण आपलं प्रेम वेगळ्या अंदाजात व्यक्त करणार असाल तर मग त्या व्यक्तीला एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जा. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या आणि जोडीदाराच्या आयुष्यात कायम लक्षात राहील.
लंच किंवा डिनर डिप्लोमसी जर आपण एखाद्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करताय तर त्या व्यक्तीला लंच किंवा डिनरला घेऊन जाणं कधीही चांगलं. त्या ठिकाणी डेजर्ट किंवा वाइनच्या सोबतीने आपण त्या व्यक्तीला अंगठी देऊन लग्नासाठी प्रपोज करु शकता.
काही वेगळी कल्पना आजचा दिवस वेगळा बनवण्यासाठी आपण काही वेगळी कल्पना निवडू शकता. जसं आपण आपल्या पार्टनरचे आतापर्यंतचे सर्व फोटो एकत्र करुन त्याचा अल्बम करु शकता. त्या अल्बमच्या माध्यमातून आपण आपले प्रेम व्यक्त करु शकता.
प्रेम पत्र द्या पूर्वीच्या काळी प्रेम व्यक्त करण्यासाठी या मार्गाचा सर्वाधिक वापर केला जायचा. आज प्रेम पत्र देणं ही गोष्ट जुनी झाली असली तरी एक वेगळी होऊ शकते. सुंदर अशा काव्यात्मक शब्दांच्या माध्यमातून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करु शकता.
फिल्मी डायलॉगचा वापर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला फिल्मी डायलॉगच्या माध्यमातून प्रपोज करु शकता. जसं 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील एक सुंदर डायलॉग आहे, एक मर्द का सिर तीन औरतों के आगे झुकता है मां के आगे, एक दुर्गा मां के आगे और तुम...
'फना चित्रपटातील एक डायलॉग आहे, 'हमसे दूर जाओगे कैसे, दिल से हमें भुलाओगे कैसे, हम वो खुशबू हैं जो सांसों में बसते हैं, खुद की सांसों को रोक पाओगे कैस.' तसेच 'कल हो ना हो' या चित्रपटातील एक डायलॉग आहे, 'प्यार तो बहुत लोग करते है, लेकिन मेरे जैसा प्यार कोई नही कर सकता, क्यूंकी किसी के पास तुम जो नहीं हो.'
'ओम शान्ती ओम' मध्ये एक चांगला डायलॉग आहे, 'इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, कि हर ज़र्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है, कहते हैं कि....अगर किसी को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने कि कोशिश में लग जाती है.'
अशा काही डायलॉगचा वापर केल्याने तुमचे प्रपोज अधिक खुलण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी कोणाला प्रपोज करायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य मार्गाचा वापर केल्यास आपल्याला यश मिळण्याची जास्त शक्यता आहे. तर मग हा दिवस वाया जाऊ देवू नका.
Valentine Week 2021: 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये 'त्या' खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहात ना?