Toast Making Process : रोजच्या नाश्त्यात वापरला जाणारा टोस्ट बनतो तरी कसा? वाचा टोस्ट बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया
Toast Making Process : सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, टोस्ट शिळ्या ब्रेडपासून बनवले जात नाहीत त्यामुळे हा गैरसमज चुकीचा आहे.
Toast Making Process : आजही टोस्ट हा चहा आणि दुधाबरोबर खाल्ला जाणारा आवडता नाश्ता आहे. आजही अनेक ठिकाणी मोठमोठ्या ब्रॅंडच्या कुकीज टोस्ट आवडीने खाल्ले जातात. अनेकांना टोस्ट खायला खूप चविष्ट वाटतो, पण सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अनेक चुकीच्या माहितीही पसरवल्या जातात. याशिवाय टोस्ट बनवण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. अनेकजण म्हणतात की, टोस्ट एक्सपायरी झालेल्या ब्रेडपासून बनवले जातात. या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की हे टोस्ट नेमके कसे तयार केले जातात.
टोस्ट शिळ्या ब्रेडपासून बनवले जातात का?
सर्वात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, टोस्ट शिळ्या ब्रेडपासून बनवले जात नाहीत त्यामुळे हा समज चुकीचा आहे. टोस्ट बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि आता तर मशीन वापरून टोस्ट बनवले जातात. ज्यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे टोस्ट अस्वच्छ पद्धतीने बनविले जातात, एकदा तो बनविल्यानंतर कोणी खाऊ शकणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे.
मग ब्रेड कसा बनवला जातो?
टोस्ट बनवण्यासाठी मुख्यतः मैदा वापरला जातो आणि तो पिठात मीठ घालून तसेच इतर अनेक गोष्टी वापरून बनवला जातो. यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र मिसळले जाते. हे सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी बराच वेळ लागतो. एकदा ते चांगले मिसळले की, त्यापासून बन्स बनवले जातात, म्हणजेच ब्रेड करण्यासाठी पीठाचे गोळे तयार केले जातात. यानंतर त्याचे लांब बन्स बनवण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यानंतर ते बेक केले जातात.
बनला दोन वेगवेगळ्या पद्धतींनी बेक केल्यानंतर टोस्टच्या आकारात ते कापले जातात. यानंतर ते दुसऱ्या मशीनमध्ये पुन्हा बेक केले जातात. तीन वेळा बेक केल्यानंतर त्याचे टोस्ट तयार होतात. तसेच, जास्त बेकिंगमुळे ते खूप घट्ट आणि क्रिस्पी होतात.
एक गोष्ट लक्षात घ्या की, मोठ्या शहरांमध्ये टोस्ट बनविण्याच्या प्रक्रियेचे सर्व काम मशीनद्वारे केले जाते. मात्र, लहान गावांमध्ये मजूर हाताने टोस्ट बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया करतात, ज्यामुळे बऱ्याच लोकांना ते खायला आवडत नाहीत. अशा प्रकारे रोजच्या नाश्त्यात वापरल्या जाणाऱ्या टोस्टची बेकिंग प्रोसेस पूर्ण केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या :