Smartphone Tips: फोनमधील स्पेस संपली? नको असलेला डेटा असा डिलीट करा
फोनमधील अॅप्समुळे मोबाईलमधील स्पेस संपते.
Smartphone Tips : सध्या अनेक लोक स्मार्टफोनचा वापर करतात. फोनमधील अॅप्सचा वापर सर्वजण करतात. या अॅप्समुळे अनेक वेळा मोबाईलमधील स्पेस संपते. स्पेस संपल्यामुळे फोन हॅंग होते अशी तक्रार अनेकांची असते. व्हॅट्स अॅपवर येणारे फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड केल्याने देखील फोनमधील स्पेस कमी होते. जाणून घेऊयात फोनमध्ये स्पेस कशी तयार करावी.
जर तुमच्या स्मर्टफोनमधील स्पेस संपली असेल तर सर्वप्रथम फोनमधील नको असलेले अॅप्स डिलीट करा.
फोनच्या गॅलरीमधील फोटो आणि व्हिडीओ चेक करा.
फोनमधील गॅलरीमध्ये असणारे फोटो आणि व्हिडीओ चेक करून नको असलेला डेटा डिलीट करा. अनेक वेळा व्हॉट्स अॅपवर सेंड केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात. ते जर तुम्ही डिलीट केले तर तुमच्या फोनमध्ये स्पेस तयार होईल. ई-मेलमधील अटॅच फाइल डाऊनलोड केल्याने ती फाइल फोनमध्ये सेव्ह होते. त्यामुळे फोनमधील स्पेस कमी होते.
Weight Loss Without Exercise : व्ययाम न करता झटपट कमी होईल वजन; ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक
असा क्लियर करा फोनमधील नको असलेला डेटा
अॅन्ड्रॉइड फोनमध्ये नको असलेला डेटा डिलीट करायचा असेल तर सर्वप्रथम सेटिंग्स ऑप्शन सिलेक्ट करा. कॅचे मेमरी हा ऑप्शन सिलेक्ट करा. हा ऑप्शन सिलेक्ट केल्याने तुमच्या फोनमधील नको असलेला डेटा डिलीट होतो.
आयफोन यूजरला जर त्यांच्या फोनमधील स्टोरेज कमी करयाचे असेल तर फोनचे सेटिंग्स ऑप्शन सिलेक्ट करून जनरलवर क्लिक करा. त्यानंतर Storage and iCloud Storage वर क्लिक करा. मेन स्टोरेजमध्ये फोनमधील स्टोरेज आणि डिव्हिजन दिसेल त्यामध्ये नको असलेल्या फाइल्स डिलीट करा.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
dry fruit paratha : घरच्या घरी झटपट बनवा; हेल्दी आणि टेस्टी ड्राय फ्रूट पराठा
Health Care Tips : शाकाहारी आहात? 'या' पदार्थांचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर