एक्स्प्लोर

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात खास करुन चेहऱ्याची काळजी घ्या... हे सोपे उपाय करा...

 Summer Skin Care Tips:उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तापाने शरीराची लाही लाही होते. यामुळं खासकरुन त्वचेवर परिणाम होतो.

Summer Skin Care Tips: उन्हाळा आला म्हटलं की तब्येत सांभाळा असं म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच असतं. कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तापाने शरीराची लाही लाही होते. यामुळं खासकरुन त्वचेवर परिणाम होतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच त्वचेची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात त्वचेमधील छिद्र झाकली जातात आणि पुरळ यायला सुरुवात होते. त्यासोबत सूर्यकिरणांमुळे मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि त्वचा काळी पडू लागते. बदलत्या ऋतुमानानुसार तुम्हाला स्कीन केअर रुटीनमध्येही बदल करण्याची गरज असते. म्हणूनच तुमच्या स्कीननुसार तुम्ही काही टिप्स वापरुन त्वचेची देखभाल योग्यरित्या करु शकता. 

उन्हाळ्याच्या दिवसांत तेलकट चेहरा असणाऱ्यांना जास्त समस्येला तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यात आपल्या त्वचेला अनुसरुन फेसवॉश असायला हवा.डीप क्लीनसाठी एक्सफोलिएशनला जास्त वेळ द्यायला हवा. तुम्ही नॉन स्टिकी मॉइस्चरायझर असणाऱ्या सनस्क्रीनचा वापर करु शकता. यासोबत तुम्ही मृतपेशी आणि तेलकटपणा घालवण्यासाठी फेस मास्कचा वापरही करु शकता. 

तुम्ही हलक्या, अल्कोहल फ्री, जेलबेस क्लीन्जरचा ऑप्शन निवडू शकता. नॉन स्टिकी, ग्रीस फ्री मॉइस्चरायझर किंवा हायड्रेटिंग सीरमपेक्षा त्वचेला पुरक पोषण मिळण्यासाठी सनस्क्रीनचाही वापर करु शकता. कोरड्या त्वचेसाठी टिप्स कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांनी मॉइस्चरायझिंग आणि उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी हायड्रेटेड मिल्क लोशनचा अवलंब करायला हवा. हे तुमच्या त्वचेसाठी हानीकारक न ठरता फायदेशीर ठरतील.

नॉर्मल त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्यात फारसा फरक पडत नाही. तुम्ही फ्रेश दिसण्यासाठी जेल बेस फेसवॉश आणि हलक्या मॉइस्चरायझरचा वापर करु शकता. यासोबत तुम्ही हायड्रेटिंग सनस्क्रीनचाही वापर करु शकता. 

उन्हाळ्यात हायड्रेटेड असणे गरजेचे असते. तुम्ही रात्री झोपताना अॅडिशनल हायड्रेशनसाठी हायड्रेटिंग फेस क्रीमचा उपयोग करु शकता. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी देखील महत्त्वाचे असते. क्लींझिंग आणि मॉयस्चरायझर व्यतिरिक्त तुम्ही व्हिटॅमिन सीच्या सीरमचाही वापर करु शकता. यासोबत नारळपाणी, टरबूज आणि फ्रेश ज्युस प्यायल्यानेही त्वचेला हायड्रेटेड राहायला मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 

महत्वाच्या बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Ratnagiri News : दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! युरोपकडून भारतासाठी मोठी बातमी, अमेरिकेसोबत जे घडलं नाही ते युरोपसोबत घडलं, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Varsha Gaikwad : धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा: खा. वर्षा गायकवाड
Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Ratnagiri News : दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू
High Court Names : शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
शहरांची नावं बदलल्यानंतर देशभरातील विविध हायकोर्टांची नावं का बदलली नाहीत? जाणून घ्या कारण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2025 | शनिवार
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
फक्त 1200 रुपये घेऊन मुंबईत आला, 300 कोटी रुपयांचा मालक झाला, जाणून घ्या 'कॉमेडी किंगची' यशोगाथा 
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर भाजपला विचारावं लागेल; सुनील तटकरेंचे वक्तव्य
Embed widget