Sleeping Method : जास्त वेळ झोपल्यानं वाढते वजन; आरोग्यावर होतो वाईट परिणाम
जास्त वेळ झोपल्याचा देखील आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात जास्त वेळ झोपल्यानं आरोग्यावर होणारा परिणाम...
Health Care Tips : रोज सात ते आठ तास झोप होणे अत्यंत आवश्यक असते, असे काहींचे मत असते. पुरेशा आहाराबरोबर पुरेशी झोपही तितकीच गरजेची आहे. कमी वेळ झोपल्याने थकवा जाणवतो. पण जास्त वेळ झोपल्याचा देखील आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात जास्त वेळ झोपल्यानं आरोग्यावर होणारे परिणाम...
जास्त झोपल्यानं आरोग्यावर होणारा परिणाम:
1 डोकेदुखी : कमी वेळ झोपल्यानं डोकेदुखी होते हे सर्वांनाच माहिती आहे, पण वेळ झोपल्यानं देखील डोकेदुखी सुरू होते. जेव्हा तुम्ही खूप वेळ झोपता तेव्हा डोक्यात जडपणाची जाणवतो. तसेच मूड खराब होतो.
2.थकवा : बराच वेळ झोपल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. शरीर आणि मेंदू यांच्यामधील संतुलन देखील बिघडते.
3 वजन वाढते : गोष्टी विसरणे, स्मरणशक्ती सतत कमी होणे या समस्या तुम्हाला जास्त वेळ झोपल्यानं जाणवतील. तसेच शरीरातील चरबी वाढते आणि तुमचे वजन वाढू शकते. बराच वेळ झोपल्यानं शरीर अॅक्टिव्ह नाही त्यामुळे चरबी वाढते. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची योग्य वेळ ठरवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तुम्ही रात्री उशीरापर्यंत काम करत असाल तरी झोपेची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांन सामोरे जावे लागत नाही.
4. अनेक लोक आठवडाभर काम करुन नंतर वीकेंडला बराच वेळ झोपतात. असं करणं देखील योग्य नाही कारण यामुळे जंक फूडसाठी क्रेविंग होणे, वजन वाढणे, मूड खराब होणे या समस्या तुम्हाला जाणवतील.
महत्वाच्या बातम्या :
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
- Health Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ
- Hiccup : पुरेसे पाणी पिऊनही वारंवार उचकी का येते? जाणून घ्या कारणे आणि उपाय