Health Tips : शिळं अन्न खाताय? मग थांबा, वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Health Tips : फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाल्ल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Health Tips : अनेक लोक रात्री तयार केलेला पदार्थ सकाळी गरम करून खातात. फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाल्ल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. फ्रिजमध्ये ठेवलेले शिळं पदार्थ खाल्ल्यानं शरीरावर काय दुष्परिणाम होतात ते पाहूयात...
फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळ्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. या बॅक्टेरियामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या शिळ्या पदार्थांमध्ये फूड पॉयझनिंग आणि पोटाच्या समस्या जाणवू शकतात. तसेच शिळा भात खाल्ल्यानं उल्टी होणे, पित्त होणे इत्यादी समस्या तुम्हाला जाणवू शकतात. तसेच तुम्हाला शिळे पदार्थ खाल्ल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते.
पचन क्रियेवर होऊ शकतो परिणाम
शिळे पदार्थ खाल्ल्यानं पचन क्रियेवर दुष्परिणाम होऊ शकतो. गॅस होणे, अॅसिडीटी होणे इत्यादी समस्या तुम्हाला जाणवू शकतात.
फ्रिजमध्ये पदार्थ ठेवल्यानंतर त्यामधील पोषक तत्वे कमी होतात. ज्या लोकांना अॅसिडीटीचा त्रास होतो त्यांनी शिळे पदार्थ खाऊ नये. त्यामुळे 48 तासांच्या आधी घरात तयार केलेले पदार्थ संपवण्याचा प्रयत्न करा.
फ्रीजमध्ये कोणते पदार्थ किती वेळ ठेवावे?
फ्रिजमध्ये ठेवलेला भात 2 दिवसात खाऊन घ्यावा, अन्यथा तो खराब होतो. जर जेवणातील डाळ शिल्लक राहिली तर तर तुम्ही ती फ्रिजमध्ये ठेवू शकता. आणि डाळ फ्रीज ठेवली असेल तर तुम्ही ती डाळ 2 दिवसांच्या आत खावी.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
- Omicron variant : त्वचेच्या 'या' प्रकारच्या समस्यांना थंडीचे दुष्परिणाम समजू नका, होऊ शकतो गंभीर परिणाम
- Sapota For Health : चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी, अशक्तपणा दूर होण्याबरोबरच शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha